शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्टचे मुख्यमंत्री कोण... देवेंद्र फडण दोन शून्य..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 01:14 IST

महाराष्टचे मुख्यमंत्री कोण? फडण दोन शून्य... मी तुझ्यासारखे पाच-सहा पाहिलेत... म्हणजेच छपन्न बघितलेत... दुसरीच्या गणिताच्या पुस्तकातील क्रांतिकारी बदलावरून सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात असून, नेटकऱ्यांनी हा विषय गांभीर्याने न घेता हास्यास्पद असल्याची टीकादेखील केली आहे.

नाशिक : महाराष्टचे मुख्यमंत्री कोण? फडण दोन शून्य... मी तुझ्यासारखे पाच-सहा पाहिलेत... म्हणजेच छपन्न बघितलेत... दुसरीच्या गणिताच्या पुस्तकातील क्रांतिकारी बदलावरून सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात असून, नेटकऱ्यांनी हा विषय गांभीर्याने न घेता हास्यास्पद असल्याची टीकादेखील केली आहे.शालेय शिक्षणक्रमात बहुसंख्य विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा विषय म्हणजे गणित होय. गणिताची ही भीती घालविण्यासाठी शासन स्तरावर अनेक उपाय यापूर्वी केले गेले आहेत. मात्र बालभारतीने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून गणित संख्या वाचनासाठी केलेला प्रयोग मात्र टीकेला कारण ठरला आहे. बत्तीस न म्हणता तीस आणि दोन, एकसष्ट ऐवजी साठ आणि एक, एकाहत्तर ऐवजी सत्तर आणि एक अशाप्रकारे उच्चार करण्याचे धडे देण्यात येणार आहे. शिक्षणतज्ज्ञांमध्ये याविषयी दोन प्रवाह असले तरी बहुतांशी तज्ज्ञ आणि नागरिकांना हा विषय पटलेला नाही. अनेक पिढ्यांपासून अशाच प्रकारे गणित शिकवले जात असताना आता असे सुलभ संख्यावाचन करण्याच्या नावाखाली गोंधळ घातला जात असून, त्यामुळे मुलांची संभ्रमावस्था अधिक वाढणार आहे. अर्थात, हा तज्ज्ञांच्या गांभीर्याचा विषय असला तरी सोशल मीडियावर बालभारतीच्या या निर्णयाची खिल्ली उडवली जात आहे.शिक्षिका - महाराष्टÑाचे मुख्यमंत्री कोण?बंटी - देवेंद्र फडण दोन शून्यत्याचप्रमाणेशिक्षिका - पाणी कोणी चोरलं?बंटी - एक दोन मतीच्या साहेबांनी...अशी बारामतीची खिल्ली उडविण्यात आली आहे.सामान्य भाषेत बोलताना काय गोंधळ उडेल, याबाबतदेखील किस्सा व्हायरल होत आहे.ती (चिडून) - अरे जा... तू काय समजतोस स्वत:ला? मी तुझ्या सारखे पाच- सहा बघितले...तो (आश्चर्याने) - पाच- सहा?त्याचा मित्र- अरे तिला छपन्न म्हणायचंय... ती नवीन सिलॅबसवाली आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपChief Ministerमुख्यमंत्री