नाशिक : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी नाशिक जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री गिरीष महाजन हे देखील दौ-यावर येत असल्याने प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली आहे.गुजरातच्या नवीन मंत्रीमंडळाचा शपथविधी समारंभ आटोपून फडणवीस दुपारी एक वाजून ५० मिनीटांनी हेलिकॉप्टरने ओझर विमानतळावर येतील व तेथून मोटारीने त्र्यंबकेश्वरकडे रवाना होतील. संत श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिर जिर्णोद्धाराचे भुमीपुजन तसेच नवीन भक्तनिवासाचे उद्घाटन दुपारी अडीच वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल त्यानंतर चार वाजून १० मिनीटांनी मुख्यमंत्री मोटारीने डोंगरे वसतीगृहात भरलेल्या शेल्टर प्रदर्शनास भेट देतील. या ठिकाणी फडणवीस एक तास थांबतील व सव्वा पाच वाजता मोटारीने ओझर विमानतळाकडे रवाना होतील. पाच वाजून ५० मिनीटांनी हेलिकॉप्टरने ते मुंबईकडे रवाना होतील.दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या दौºयाने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, चालू महिन्यातच मुख्यमंत्र्यांनी त्र्यंबकेश्वर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी हजेरी लावली होती. त्र्यंबक नगरपालिकेत सत्तांतर होऊन भाजपाच्या हाती सत्ता मिळाल्याने यावेळी नगरपालिकेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस मंगळवारी नाशकात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 15:59 IST
नाशिक : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी नाशिक जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री गिरीष महाजन हे देखील दौ-यावर येत असल्याने प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली आहे.गुजरातच्या नवीन मंत्रीमंडळाचा शपथविधी समारंभ आटोपून फडणवीस दुपारी एक वाजून ५० मिनीटांनी हेलिकॉप्टरने ओझर ...
मुख्यमंत्री फडणवीस मंगळवारी नाशकात
ठळक मुद्दे मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री गिरीष महाजन हे देखील दौ-यावर संत श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिर जिर्णोद्धाराचे भुमीपुजन