शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

मुख्य कार्यकारी अधिकारी मीणा यांची अखेर बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 12:22 AM

नाशिक : खातेप्रमुख व अधिकाºयांना वेठीस धरून फाइल्सची अडवणूक केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेले मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांची अखेर तडकाफडकी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी मीरा भार्इंदर महापालिकेचे आयुक्तएन. बी. गिते यांची नेमणूक करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. मीणा यांनी आपल्या आत्पकालीन कारकिर्दीत जिल्हा परिषदेत मोठी दुफळी निर्माण करून राजकारण केल्याने मीणा यांच्या बदलीसाठी दहा आमदार एकत्र आले होते.

ठळक मुद्देखातेप्रमुख व अधिकाºयांना वेठीस धरून फाइल्सची अडवणूक मीणा यांच्या बदलीसाठी दहा आमदार एकत्र आले होते

नाशिक : खातेप्रमुख व अधिकाºयांना वेठीस धरून फाइल्सची अडवणूक केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेले मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांची अखेर तडकाफडकी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी मीरा भार्इंदर महापालिकेचे आयुक्तएन. बी. गिते यांची नेमणूक करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. मीणा यांनी आपल्या आत्पकालीन कारकिर्दीत जिल्हा परिषदेत मोठी दुफळी निर्माण करून राजकारण केल्याने मीणा यांच्या बदलीसाठी दहा आमदार एकत्र आले होते.यवतमाळचे प्रकल्प अधिकारी ते नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशी अल्प कारकिर्द असतानाही जिल्हा परिषदेचे सूत्र हाती घेतल्यापासून ते वादग्रस्त ठरले. आलेल्या फाइल्सवर स्वाक्षरी न करताच त्या परत पाठवून देण्याचा धडाकाच त्यांनी लावला होता. शिवाय ‘टॉक मी’ असा शेरा मारून परत पाठविण्यात आलेल्या फाइल्सवर मात्र ते चर्चाही करीत नव्हते. त्यामुळे अधिकारी आणि खातेप्रमुखही अडचणीत आले होते. त्यातच त्यांनी ग्रामसेवकांवर थेट निलंबानाची कारवाई सुरू केल्यामुळे ग्रामसेवक संघटनेने मीणा यांच्याविरोधात असहकार आंदोलन पुकारले होते.फाइल्सची अडवणूक होत असल्याने आणि त्रुटीही दूर होत नसल्यामुळे जिल्ह्णातील विकासकामांना ब्रेक लागला होता. याप्रकरणी जाब विचारणाºया जिल्हा परिषद सदस्यांनाही ते भेटत नव्हतेच शिवाय त्यांना तासनतास दालनाबाहेरच ताटकळत ठेवत असल्याने सदस्यांमध्येही त्यांच्याविषयी रोष होताच. जिल्ह्णातील एका आमदाराशीही त्यांनी हुज्जत घालत त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यापर्यंत मीणा यांची मजल गेली होती. त्यांच्या या अरेरावी आणि एककल्ली काराभारामुळे अवघ्या जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प झाले होते. अधिकाºयांना तर ते दोन मिनिटेही दालनात उभे करीत नसल्याने फाइल्सवरील निर्णय लांबणीवर पडत होते. परंतु अधिकाºयाचाही नाईलाज झाल्याने त्यांनाही उघडपणे भूमिका घेण्यास अडचण निर्माण झाली होती. मात्र मीणाविरोधात त्यांच्यातील असंतोष बाहेर पडण्यासही सुरुवात झाली होती.मीणा यांनी जिल्ह्णातील काही लोकप्रतिनिधींवर पक्षपातीपणाचा आरोप करीत प्रशासनप्रमुख विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्यावरही अप्रत्यक्ष कामकाजातील हस्तक्षेपाविषयी आरोप चालविला होता. त्यांच्या या कारभारामुळे त्रस्त झालेले सुमारे दहा आमदारांनी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन त्यांच्या बदलीची मागणी लावून धरली होती. हे प्रकरण मंत्रालयापर्यंत पोहचला होते. दुसरीकडे मीणा यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेल्या संघटनेने या वादाला विशिष्ट वळण दिल्याने मीणा यांची बदली होते की नाही अशी रोजच चर्चा होत होती.अखेर आज सायंकाळी मीणा यांच्या बदलीचे आदेश निघाले असून, मीणा यांच्या जागेवर मीरा भार्इंदरचे आयुक्तएन. बी. गिते यांची मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मीणा यांना मात्र अद्याप कोठेही पोस्टिंग देण्यात आली नसल्याने ही कारवाई अपेक्षितच मानली जात आहे. विशेष म्हणजे सोमवारी सकाळी मीणा यांनी जिल्हा परिषदेत येऊन अधिकारी, खातेप्रमुखांची बैठक घेत सामंजस्याची भूमिका घेत शांतपणे चर्चा केली होती.—समर्थक संघटना तोंडघशी—मीणा यांची तातडीने बदली झाल्याने त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरणारी संघटना तोंडघशी पडली आहे. वादग्रस्त कामकाजामुळे चर्चेत असलेले मीणा यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असताना आणि लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांना ते नको असतानाही एका संघटनेने मीणा यांच्या कार्याचे उघड कौतुक करणे सुरू केले होते. किंबहूना काही अधिकाºयांवर आरोप करीत संघटनेने चौकशीची मागणीही केली होती. संघटना एकीकडे मीणा यांचे समर्थन करीत असतानाच त्यांच्या बदलीचे आदेश आल्याने समर्थक संघटनेचे मनसुबे उधळले आहेत.