शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

छावा जनक्रांतीची बेजबाबदार रुग्णालयांवर कारवाईची मागणी ; वीजबील वाढीचा मुद्दाही  मांडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 13:55 IST

काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाविषयी बेजबाबदारपणे काम सुरू असून, कॅनडा कॉर्नर परिसरातील एका रुग्णलायाविरोधात अशाचप्रकारे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना न करता रुग्णांच्या आरोग्यविषयी निष्काळजीपणा दाखविण्यात येत असल्याचा आरोप छावा जनक्रांती संघटनेच्या महासचिव अ‍ॅड. अलका शेळके-मोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निवेदनाच्या माध्यमातून केला आहे. 

ठळक मुद्देकोरोनाविषयी बेजबाबदार रुग्णालयांविरोधात छावा जनक्रांती आक्रमक रुग्णालयांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचा आरोप राज्यस्तरीय समितीमार्फत चौकशीची मागणी

नाशिक : शहातील काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाविषयी बेजबाबदारपणे काम सुरू असून, कॅनडा कॉर्नर परिसरातील एका रुग्णलायाविरोधात अशाचप्रकारे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना न करता रुग्णांच्या आरोग्यविषयी निष्काळजीपणा दाखविण्यात येत असल्याचा आरोप छावा जनक्रांती संघटनेच्या महासचिव अ‍ॅड. अलका शेळके-मोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.२) जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केला आहे. नाशिक शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात कोरोना रुग्णाचा खुलेआम वावर असून, त्यांचा अन्य रु ग्ण व त्यांच्या नातेवाइकांशीही संबंध येत असल्याने कोरोनाचा फैलाव वाढण्याची भीती व्यक्त करीत अशा संघटनेची राज्यस्तरीय समितीकडून चौकशी करण्याची मागणी संघटनेतर्फे करण्यात आली. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना झालेल्या बोगस बियाण्यांच्या पुरवठयास जबाबदार व्यक्तींसह ग्राहकांना वाढीव वीज बिलांचा झटका देणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या पधादिकाऱ्यांनी केली आहे. दरम्यान, संघनटेने यासंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व मुख्यमंत्री कार्यालयास यापूर्वीही निवेदन दिले असून, संबंधित रुग्णालयावर कारवाई झाली नाही, त्यामुळे संघटनेने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनचा इशारा दिला होता. त्यापार्श्वभूमीव कोणतीही अनपेक्षित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात चोख बंदोबस्त तैनात केला होता. मात्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्याची भेट घेऊन याविषयांसंदर्भात चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबिधत विषयांवर गांभीर्याने कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने कोणतेही आंदोलन न करता  संघटनेकडून केवळ मागण्याचे सादर करण्यात आले.  यावेळी संघटनेनचे अ‍ॅड. अलका शेळके-मोरे यांच्यासह सुषमा बोरसे, निलोफर शेख, गोपाळ सोनवणे, वैभव गवाल, युवराज राजपूत, जैनब शेख आदी उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकcollectorजिल्हाधिकारीchava organisationछावा संघटनाelectricityवीज