नाशिक : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’,‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय’चा जयघोष करीत शेकडो शिवप्रेमींनी रयतेचे राजे श्री छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा केला. शिवजयंतीनिमित्त शहरातून पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. यावर्षीच्या मिरवणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सहभागी मंडळांनी ‘डीजे’ला फाटा दिल्याने केवळ ढोल-ताशांचा गजर कानी पडला.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार शहरात बुधवारी (दि. १५) मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच शहरासह उपनगरांमध्ये शिवरायांना अभिवादन करण्यासाठी विविध सामाजिक संघटना, मित्रमंडळांची लगबग दिसून येत होती. भगवे ध्वज, पताका आणि शिवरायांच्या सामर्थ्यशाली देदीप्यमान इतिहास सांगणारे पोवाडे दिवसभर कानी ऐकू येत होते. पारंपरिक पद्धतीनुसार संध्याकाळी पाच वाजता जुने नाशिकमधील फाळके रस्त्यावरील मुख्य चौकातून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.
.छत्रपतींचा जयजयकार
By admin | Updated: March 15, 2017 23:46 IST