शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

"येवल्यातून उमेदवारी दिली नाही तर मीच निवड केली"; शरद पवारांच्या आरोपांना भुजबळांचं उत्तर

By संदीप भालेराव | Updated: July 9, 2023 16:35 IST

राष्ट्रवादीतील अजित पवार गटात मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांच्या येवला या मतदारसंघातून शरद पवार यांनी आपल्या राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली.

नाशिक - शरद पवार यांनी आपणास जुन्नर मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला होता. परंतु येवल्याच्या विकासासाठी आणि तेथील जनतेच्या आग्रहामुळे येवला मतदारसंघाची मी निवड केली. खरेतर तेथून लढण्यात रिस्क होती तरीही येथून निवडून आलो. त्यानंतर जनतेने सलग चार वेळा मोठ्या मतधिक्क्याने निवडून दिले. तरीही पवार साहेब येवल्यात येऊन चुकीचा उमेदवार दिला असे म्हणून माफी मागत असतील तर पवार यांना याचा विसर पडल्याचे दिसते, अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केली.

येवल्यात येऊनच सभा घेण्याचे कारण काय? असा सवालही त्यांनी शरद पवार यांना विचारला. राष्ट्रवादीतील अजित पवार गटात मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांच्या येवला या मतदारसंघातून शरद पवार यांनी आपल्या राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली. शनिवारी (दि.८) पवार यांनी येवल्यात सभा घेत भुजबळांना येवल्यातून उमेदवारी दिल्याची आपली चूक होती याबद्दल मी मतदारांची माफी मागतो, असे विधान सभेत केले होते. त्यास भुजबळ यांनी रविवारी (दि.९) उत्तर दिले.

२००४ मधून उमेदवारीसाठी एरंडोल, वैजापूर, मुंबई, जुन्नर, लासलगाव आणि येवला येथूनही आपणाला विचारणा केली जात होती. येवल्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीदेखील आपणास येवल्याच्या विकासासाठी लढण्याचा आग्रह धरला होता. त्यावेळी पवार यांनी आपणास जुन्नर मतदारसंघातून लढण्याचा सल्ला दिला होता. परंतु मी येवल्यातून लढण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचे प्राबल्य असताना या मतदारसंघातून लढण्याची रिस्क घेतली आणि निवडून आलो. त्यामुळे शरद पवारांनी आपणास येथून उमेदवारी दिली असे नाही तर मी स्वता:च येवल्याची निवड केली होती, असे स्पष्टीकरण भुजबळ यांनी यावेळी दिले. येवल्यातील विकासाचे कौतुक स्वत: शरद पवार यांनी केले होते. याचा विसर त्यांना पडल्याचे भुजबळ म्हणाले.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण