सीटीएस : पाच दिवसांपासून धनादेश वसुलीच्या प्रतीक्षेतनाशिक : धनादेशांचे व्यवहार अधिक जलद आणि विश्वासू व्हावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या चेक टंकेशन सिस्टममध्येच नवे धनादेश अडकून बसले असून, सुमारे चार दिवसांपासून धनादेशांची रक्कम वसूल न झाल्याने ग्राहकही संतप्त झाले आहेत. अनेक वेळा मुदतवाढ मिळून अखेर १ मेपासून सुरू झालेल्या सीटीएस (चेक ट्रंकेशन सिस्टम) पद्धतीचा उपयोग करण्याबाबत कोणतेही प्रशिक्षण न देण्यात आल्याने बॅँक कर्मचारी याबद्दल मोठ्या प्रमाणात अनभिज्ञ होते. जवळपास सर्वच बॅँकांमध्ये हा गोंधळ सुरू होता. दुसरीकडे या पद्धतीच्या वापराबाबत ग्राहकांनाही पुरेशा सूचना नसल्याने धनादेशाला टाचण्या लावल्याने त्यांच्या स्कॅनिंगला काही ठिकाणी अडचणी आल्या. नव्या पद्धतीत धनादेश कसे भरायचे याचे ज्ञान नसल्याने अनेकांचे धनादेश अडकून पडले, तर काही ठिकाणी ते कर्मचार्यांच्या अज्ञानामुळे अडकून पडले. वेगवान प्रक्रियेसाठी बाद ठरविलेल्या मायकर पद्धतीत केवळ दोन दिवसांत क्लीअर होणार्या धनादेशांना आधुनिक सीटीएस प्रणालीचा फटका बसला असून, गेल्या पाच दिवसांपासून अनेकांना धनादेशाच्या रकमेची प्रतीक्षा आहेे. काही ठिकाणी यंत्रणेत आलेल्या अडचणींचा फटका ग्राहकांना बसला. यंत्रणेत आणि नेटवर्क कनेक्शनमध्ये दोष आढळल्याने धनादेश पास होत नसल्याचे काही बॅँकांमधून सांगण्यात आले. यापूर्वी जिल्हा स्तरावर होत असलेल्या धनादेशांचे क्लीअरिंग आता मुंबई येथे होणार असून, तेही चार राज्यांचे एकाच ठिकाणी होणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या शासनाच्या संस्थेकडे आता धनादेश क्लीअरिंगचे काम देण्यात आले असून, तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर दोन दिवसांत धनादेश क्लीअर होऊ शकतील. संपूर्ण यंत्रणा सुरळीत व्हायला काही दिवस लागणार असल्याने तोपर्यंत तरी ग्राहकांना आणि बॅँक कर्मचार्यांनाही अडचणींचा सामना करावा लागणार आहे.दोन दिवसांत कामकाज सुरळीतविविध स्तरांवर येणार्या अडचणींमुळे धनादेश क्लीअर व्हायला अडचणी येत आहेत. धनादेश स्कॅन करून क्लीअरिंग हाऊसमध्ये पाठविले जात आहेत. त्यात येणार्या तांत्रिक अडचणींमुळेही धनादेश पास होण्यास अडचणी येत आहेत. येत्या दोन दिवसांत या समस्या सुटतील आणि धनादेश वेळेत पास होतील.- बाबूलाल बंब (क्षेत्रीय व्यवस्थापक, स्टेट बॅँक)
नव्या यंत्रणेत अडकले धनादेश
By admin | Updated: May 9, 2014 23:34 IST