नाशिकरोड : पंजाबमधील दिनानगर भागात अतिरेक्यांनी केलेला हल्ला व अमृतसर-पठाणकोट रेल्वे मार्गावर सापडलेल्या पाच बॉम्बच्या घटनेनंतर नाशिकरोड रेल्वेस्थानकावर सोमवारी सकाळपासून ‘हाय अलर्ट’ जारी करून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच श्वान पथकाकडून रेल्वेस्थानक परिसराची व प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात येत होती. पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील दिनानगर भागात सोमवारी पहाटे अतिरेक्यांनी गोळीबार करून एका पोलीस ठाण्यावर हल्ला केला. पहाटेपासून सायंकाळपर्यंत अतिरेकी व पोलीस-लष्करी जवान यांच्यामध्ये घमासान सुरू होते. दरम्यान, सकाळी अमृतसर-पठाणकोट रेल्वे मार्गावर पाच बॉम्ब ठेवण्यात आलेले होते.
नाशिकरोड स्थानकात तपासणी
By admin | Updated: July 28, 2015 00:59 IST