लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : चांदगिरी येथील महिलेस मोबाइलवर कमी किमतीत कपडे विकण्याचे आमिष दाखवत अज्ञात व्यक्तीने ८० हजारांची फसवणूक केली.चांदगिरी येथील कृष्णा खंडेराव बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २२ ते २४ आॅगस्टदरम्यान त्यांच्या पत्नीच्या मोबाइलवर अज्ञात व्यक्तीने संदेश पाठवला.कमी किमतीत कपडे देण्याचे आमिष दाखवले. पत्नीकडून क्यू आर कोडद्वारे ८० हजार रुपये स्वीकारले. मात्र कपडे दिले नाहीत. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात महिलेच्या फसवणुक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमिष दाखवून महिलेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 00:54 IST