शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

आॅलिम्पिकपटू दत्तू भोकनळ विरोधात फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 01:06 IST

रिओ आॅलिम्पिक २०१६च्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नौकानयनपटू दत्तू बबन भोकनळ याच्याविरोधात एका पोलीस महिलेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आपल्याशी विवाह करूनही दत्तू भोकनळ हा आपला स्वीकार न करता शारिरीक, मानसिक छळ करीत असल्याची तक्रार पीडित महिलेने पोलिसांत दाखल केली आहे.

नाशिक : रिओ आॅलिम्पिक २०१६च्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नौकानयनपटू दत्तू बबन भोकनळ याच्याविरोधात एका पोलीस महिलेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आपल्याशी विवाह करूनही दत्तू भोकनळ हा आपला स्वीकार न करता शारिरीक, मानसिक छळ करीत असल्याची तक्रार पीडित महिलेने पोलिसांत दाखल केली आहे.नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयातील शिपाई आशा दत्तू भोकनळ (२६) यांनी आडगाव पोलीस ठाण्यात दत्तू भोकनळ विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, आळंदी येथे २२ डिसेंबर २०१७ रोजी आपला दत्तू यांच्याबरोबर विवाह झाल्यानंतर आशा यांच्या घरी व पुणे येथे दोघे काही दिवस पती-पत्नीप्रमाणे एकत्रही राहिले. दत्तू यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ९ फेब्रुवारी २०१९ रोजी गावी जाऊन सर्वांसमक्ष लग्न करण्याचे ठरून लग्नाची खरेदीही केली. परंतु, सर्व तयारी करूनही दत्तू यांनी लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी तब्येत ठीक नसून दवाखान्यात अ‍ॅडमिट असल्याचे सांगत ७ फेबु्रवारीला लग्नाला येणार नसल्याचे कळविले. तसेच पुन्हा फोन करून लग्नाविषयी विचारले तर विष घेऊन आत्महत्या करू, असेही धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दि, १३ व १४ फेब्रुवारी रोजी दत्तू भोकनळ आडगाव पोलीस मुख्यालय येथे आशा भोकनळ यांच्या घरी येऊन त्यांना शिवीगाळ करीत वादावादी केल्याचेही फिर्यादीचे म्हणणे आहे. दरम्यान, संगमनेर येथे २४ फे ब्रुवारी २०१९ पुन्हा नातेवाइकांसमोर विवाह करण्याचे ठरले. लग्नाची तयारी करूनही पुन्हा लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी दत्तू यांनी लग्नास नकार देत आपला नाद सोडून देण्याचे सुनावले. दि. ३ मार्चला आशा यांनी पुणे येथे जाऊन दत्तू यांच्याशी चर्चा केली, परंतु त्यांनी एकदा लग्न केलेले आहे. पुन्हा विवाहसमारंभ करणार नाही व आपल्यासोबत घरीही नेणारही नसल्याचे सांगत आपली फसवणूक केल्याचा आरोप आशा भोकनळ यांनी फिर्यादीतून केला आहे.सदर प्रकरणाविषयी अधिक बोलता येणार नाही. हे आपल्याविरुद्धचे षडयंत्र असून, आपणाला फसविले जात आहे. खरी काय परिस्थिती आहे हे न्यायालयातूनच समोर येईल. तोपर्यंत अधिक बोलणे उचित होणार नाही. - दत्तू भोकनळ, रोर्इंगपटू

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस