शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

फेरीवाला क्षेत्र निश्चितीस विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2016 00:10 IST

आजपासून होणार कारवाई : राष्ट्रीय फेरीवाला संघटनेचे निवेदन

 नाशिक : विभागीय फेरीवाला समितीची स्थापना न करता आणि या समितीची मान्यता न घेताच नाशिक महानगरपालिकेने १५ फेब्रुवारीपासून फेरीवाला क्षेत्राव्यतिरिक्त व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्या विक्रेत्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. या फेरीवाला क्षेत्रालाच राष्ट्रीय फेरीवाला संघटनेने विरोध केला आहे.यासंदर्भात राष्ट्रीय फेरीवाला संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय फेरीवाला धोेरण २००९ कायद्यानुसार शहर फेरीवाला समितीच्या सदस्यांना विचार व विश्वासात न घेता तसेच बंधनकारक असलेल्या विभागीय फेरीवाला समितीची स्थापना न करता या समितीची मंजुरी न घेता शहर फेरीवाला समितीच्या नावाखाली मनपा प्रशासन मनमानी व हुकूमशाही करीत आहे. फेरीवाला व्यावसायिकांना व्यवसाय परवाना तसेच फेरीवाला क्षेत्र निश्चितीच्या प्रस्तावास दिलेली मंजुरीच बेकायदेशीर असून, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय फेरीवाला संघटनेने त्याचा धिक्कार केला आहे. व्यवसाय परवाना अर्ज भरण्याची मुदत संपलेली असतानाही बेकायदा मुदतीत नागरी संरक्षण दल संस्थेमार्फत सर्वेक्षणाचे बेकायदा काम चोरी-छुपे सुरू आहे. संस्थेचे कर्मचारी आर्थिक लाभापोटी मुदतबाह्य बेकायदा सर्वेक्षणाचे अर्ज भरून घेत आहे. नाशिककर फेरीवाल्यांना येत्या १५ फेब्रुवारीपासून बळाचा वापर करून नियोजितस्थळी व्यवसाय न केल्यास जप्तीची व गुन्ह्याची भीती दाखवित इशारा दिला आहे. तो अन्यायकारक असून, लोकशाहीविरुद्ध ठोकशाहीच्या या प्रकारच्या कारवाईचा राष्ट्रीय फेरीवाला संघटना संघर्ष करण्यास तयार असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक सानप, जिल्हाध्यक्ष भिराज जाधव, इजहार शेख, महेंद्र जाधव, राजेंद्र शेलार, राजेंद्र बागूल, लताबाई बर्डे आदिंनी दिला आहे. (प्रतिनिधी)