उमराणे : तब्बल चाळीस वर्षांनंतर चणकापुर झाडी एरंडगाव उजव्या कालव्याचे पुरपाणी उमराणे येथील परसुल धरणात पोहचले असुन चांदवड-देवळा चे आमदार राहुल अहेर यांच्या हस्त वाढवुन पाणीपुजन पुजन करण्यात आले. हा कालवा अद्यापही अपुर्णावस्थेत असल्याने कालवा पुर्णत्वाच्या कामासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरु आहे.सदर कालव्याचे काम उमराणे येथील ब्रिटिशकालीन परसुल धरणापर्यंत पुर्ण झाले असल्याने कालव्यांतर्गत रामेश्वर धरणातून परसुल धरण भरण्यासाठी पाणी मिळावे यासाठी उमराणेसह परिसरातील नागरिकांनी लढा उभारु न धरण भरु न देण्यासाठीची मागणी शिष्टमंडळाने केली होती. पाणी मिळवुन दिल्याबद्दल शेतकरी संजय भिका देवरे व ग्रामस्थांच्या वतीने आमदार राहुल अहेर सत्कार करण्यात आला. दरम्यान पाणीपुजनआधी झालेल्या बैठकीत परसुल धरण भरु न देण्यासह वहनक्षमता,कालव्याला ठिकठिकाणी नविन गेट बसविणे आदींसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी प्रशांत देवरे, धर्मा देवरे,यशवंत शिरसाठ, नंदन देवरे, कैलास देवरे, राजेंद्र देवरे, केदा शिरसाठ, दादा जाधव, राजु संतकृपा, मनेश ब्राम्हणकर आदिंनी मनोगत व्यक्त केले. पाणीपुजनाप्रसंगी आमदार राहुल अहेर , भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, प्रशांत देवरे, यशवंत शिरसाठ, धर्मा देवरे, विलास देवरे, राजेंद्र देवरे, नंदन देवरे, पंडीत देवरे, दिलीप देवरे, कैलास देवरे,सचिन देवरे,सुभाष देवरे, संदिप देवरे, भरत देवरे, बाळासाहेब देवरे, महेंद्र पाटील, बाळासाहेब अहेर, दत्तु देवरे,रमेश देवरे,अरु ण पाटील, दिहवडचे सरपंच आदिनाथ ठाकुर,आदिंसह उमराणे, सांगवी, कुंभार्डे, तिसगाव, दिहवड, चिंचवे आदी गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
चणकापुर कालव्याचे पाणी परसुल धरणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 15:59 IST
उमराणे : तब्बल चाळीस वर्षांनंतर चणकापुर झाडी एरंडगाव उजव्या कालव्याचे पुरपाणी उमराणे येथील परसुल धरणात पोहचले असुन चांदवड-देवळा चे आमदार राहुल अहेर यांच्या हस्त वाढवुन पाणीपुजन पुजन करण्यात आले.
चणकापुर कालव्याचे पाणी परसुल धरणात
ठळक मुद्देकालवा अद्यापही अपुर्णावस्थेत असल्याने कालवा पुर्णत्वाच्या कामासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरु आहे.सदर कालव्याचे काम उमराणे येथील ब्रिटिशकालीन परसुल धरणापर्यंत पुर्ण झाले असल्याने कालव्यांतर्गत रामेश्वर धरणातून परसुल धरण भरण्यासाठी पाणी मिळावे यासाठी उमराणे