शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
3
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
4
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
5
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
6
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
7
९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा
8
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
9
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
10
आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
11
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
12
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
13
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
14
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
15
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
16
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
17
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
18
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
19
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
20
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूररोड, कॉलेजरोडवरील वाहतूक मार्गांत बदल

By admin | Updated: May 9, 2014 23:59 IST

नाशिक : बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र ते नीलगिरी बाग येथे नव्याने सुरू होणार्‍या जलशुद्धीकरण केंद्रासाठी पाइपलाइन करण्यात येणार आहे. त्यामुळे कॉलेजरोड, गंगापूररोड परिसरातील वाहतूक मार्गांत बदल करण्यात आला आहे.

नाशिक : बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र ते नीलगिरी बाग येथे नव्याने सुरू होणार्‍या जलशुद्धीकरण केंद्रासाठी पाइपलाइन करण्यात येणार आहे. त्यामुळे कॉलेजरोड, गंगापूररोड परिसरातील वाहतूक मार्गांत बदल करण्यात आला आहे. पाइपलाइन टाकण्याचे काम कॉलेजरोड, गंगापूररोडने होणार असल्याने या मार्गांतील वाहतुकीचे नियोजन बदलण्यात आले आहे. सदर काम हे रस्त्याच्या कडेने करण्यात येणार असून, यापैकी बीवायके सर्कल, कॉलेजरोड व दिवट्या बुधल्या चौक गंगापूररोड या ठिकाणी वाहतुकीच्या मार्गावरून क्रॉसिंग करून जलशुद्धीकरणाची पाइनलाइन टाकण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे कॉलेजरोड व गंगापूररोड क्रॉसिंगच्या ठिकाणी रस्ता क्रॉसिंग करून पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण होईपर्यंत हा बदल असणार आहे. सदर पाइपलाइन ही बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र ते बीवायके सर्कल- थत्तेनगर-दिवट्या बुधल्या चौक-गंगापूरोड-विद्याविकास सर्कल-मामा मुंगी कार्यालयापासून-जुने पंपिंगस्टेशन-कुसुमाग्रज उद्यान-गोदावरी नदीच्या पाइपलाइनसाठी टाकलेल्या पुलावरून-शेतातून-मखमलाबाद रोड जगझाप मार्ग जंक्शन-कॅनॉलरोड-नवीन मार्केट यार्डचे बाजूने-पेठरोड-तारवालानगर-शेतमार्गाने एसएसडीनगर-मुंबई आग्रारोड आरोग्यधाम विडी कामगार ते कॅनॉलजवळील नीलगिरी बाग येथील प्रस्तावित नवीन जलशुद्धीकरण केंद्र याप्रमाणे टाकण्यात येणार आहे. सदर काम हे रस्त्याच्या कडेने होणार आहे. बीवायके सर्कल- कॅनडा कॉर्नरकडून बीवायके कॉलेजकडे जाणारा मार्ग बीवायके सर्कल चौफुलीच्या ठिकाणी दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. पर्यायी मार्ग- कॅनडा कॉर्नरकडून बीवायके कॉलेजकडे जाणारी सर्व वाहने ही श्रद्धा मॉल चौकापासून डाव्या बाजूने वळण घेऊन हॉटेल सायंतारा- येवलेकरमार्ग-शिर्केमळा-कीर्ती सोसायाटी-जॉगिंग ट्रॅक-उजव्या बाजूने वळण घेऊन-कुशीनगर हौसिंग सोसायटी-डॉन बास्को स्कूल चौफुलीपर्यंत येऊन पुन्हा कॉलेजरोडने पुढे मार्गक्रमण करतील. भोसला स्कूलकडून कॉलेजमार्गे येणारी वाहने ही डॉन बॉस्को स्कूल चौफुलीपर्यंत आल्यानंतर उजव्या बाजूने कुशीनगर हौसिंग सोसायटीतून श्रद्धा मॉलपर्यंत येतील तेथून पुन्हा कॉलेजरोडने कॅनडा कॉनर्रपर्यंत जातील. गंगापूररोड- आनंदवल्लीकडून अशोकस्तंभाकडे जाणारा मार्ग व अशोकस्तंभाकडून आनंदवल्लीकडे जाणारा मार्ग हा हॉटेल दिवट्या बुधल्यापर्यंत दोन्ही बाजूने बंद राहणार आहे. पर्यायी मार्ग- आनंदवल्लीकडून येणारी वाहने ही जेहान सर्कलला आल्यानंतर उजव्या बाजूने क्रोमा शोरूम-निर्माण हाउस चौफुली-कमल रेसिडेन्सी-डाव्या बाजूने विद्याविकास सर्कल पर्यंत आल्यानंतर गंगापूररोडने इतरत्र जातील. अशोकस्तंभाकडून जाणारी वाहनेदेखील विद्याविकास सर्कल, कमल रेसिडेन्सी-निर्माण हाउस चौक ते डॉन बॉस्को सेंटरच्या मागील रस्त्याने जेहान सर्कल याच मार्गाचा अवलंब करतील.