शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

वाहतूक मार्गात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:49 IST

शहरातील मोठ्या श्रीगणेश मंडळांनी केलेल्या भव्य आरास पाहण्यासाठी शहरवासीय तसेच आजूबाजूच्या खेड्यातील नागरिकांची शहरात गर्दी होते़ या गर्दीमुळे तसेच वाहनांमुळे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी शहरातील अठरा मार्गांमध्ये बदल केले असून, त्याऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

नाशिक : शहरातील मोठ्या श्रीगणेश मंडळांनी केलेल्या भव्य आरास पाहण्यासाठी शहरवासीय तसेच आजूबाजूच्या खेड्यातील नागरिकांची शहरात गर्दी होते़ या गर्दीमुळे तसेच वाहनांमुळे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी शहरातील अठरा मार्गांमध्ये बदल केले असून, त्याऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पोलीस आयुक्तांनी वाहतुकीतील हे बदल शेवटच्या पाच दिवसांसाठी केले असून, बुधवार (दि़ ३० आॅगस्ट) ते मंगळवार (दि़ ५ सप्टेंबर) सायंकाळी ६ ते रात्री १२ या कालावधीत या मार्गावर वाहतुकीस बंदी असणार आहे़ तसेच हे मार्ग पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दल यांच्यासाठी खुले असणार आहे़ याबरोबरच या मार्गावरील स्थानिक रहिवाशांना या मार्गातील बदल लागू नसल्याचे वाहतूक शाखेने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे़वाहतुकीसाठी बंद असलेले रस्ते :खडकाळी सिग्नल ते शालिमारमार्गे सीबीएसखडकाळी सिग्नल ते नेहरू गार्डनकडून मेनरोड व बादशाही कॉर्नरकडे जाणारा रस्तात्र्यंबक पोलीस चौकी ते बादशाही कॉर्नरपर्यंतचा रस्तागाडगे महाराज पुतळा ते धुमाळ पॉइंट ते मंगेश मिठाई कॉर्नरसीबीएसकडून शालिमार व नेहरू गार्डनकडे जाणारा रस्तामेहेर सिग्नलकडून सांगली बॅँक सिग्नल - धुमाळ पॉइंट - दहीपुलाकडे जाणारा रस्ताप्रतीक लॉजकडून नेपाळी कॉर्नरकडे जाणारा रस्ताअशोकस्तंभाकडून रविवार कारंजा तेथून मालेगाव स्टॅँडकडे जाणारा रस्तारविवार कारंजाकडून सांगली बॅँक सिग्नलकडे जाणारा मार्गवाहतूक मार्गातील बदलनिमाणी बसस्थानक येथून शालिमारमार्गे नाशिकरोडच्या दिशेने जाणारी वाहतूक रविवार कारंजावरून सांगली बॅँक सिग्नलपर्यंत करता येईल़ त्यानंतर सांगली बॅँक सिग्नल ते सारडा सर्कलपर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल.नाशिकरोडहून निमाणीच्या दिशेने येणाºया सर्व प्रकारच्या वाहनांना सारडा सर्कलपर्यंत येता येईल; मात्र शालिमार ते सीबीएसपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद असेल.अशोकस्तंभ ते रविवार कारंजा दरम्यान दोन्ही बाजू नो पार्किंग म्हणून घोषित आहे.किटकॅट चौफुली ते कालिदास कला मंदिरमार्गे सुमंगल कपड्याच्या दुकानामार्गे शालिमार चौकाकडे जाणाºया दोन्ही बाजू वाहतुकीसाठी बंद असतील. या मार्गावर पर्यायी मार्ग म्हणून किटकॅट चौफुलीवरून खडकाळी सिग्नलमार्गे शालिमारच्या दिशेने वाहनचालक जातील.सीबीएसवरून कान्हेरेवाडी मार्गे किटकॅट चौफुली किंवा शालिमारकडे जाणारी वाहतूक दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद असेल.पंचवटीतील सरदारचौक ते श्री काळाराम मंदिरपर्यंतचा रस्ता दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद असेल.मालवीय चौक ते गजानन चौक तेथून नागचौक ते शिवाजी चौक, तेथून मालवीय चौक असा मार्ग दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद असेल.निमाणी - पंचवटी कारंजा - मालेगाव स्टॅँड - रविवार कारंजा मार्गावरून अवजड वाहनांना सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असेल. त्यामुळे या मार्गावरून जाणाºया वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून पंचवटी कारंजा - काट्यामारुती चौक - संतोष टी पॉइंट - कन्नमवार पूल - द्वारका सर्कल या मार्गाने नाशिक, नाशिकरोड, अंबड, सातपूर व इतर ठिकाणी जाता येणार आहे.सीबीएस ते पंचवटीच्या दिशेने जाणाºया शहर बस, अवजड वाहनांना अशोकस्तंभ ते रविवार कारंजा मार्गे पंचवटी कारंजापर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद असेल. पर्यायी मार्ग म्हणून अशोकस्तंभ, रामवाडी पूल, मखमलाबाद नाका, पेठनाका सिग्नल, दिंडोरी नाका या मार्गे निमाणीपर्यंत जाणार आहेत.