शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कामकाजात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 00:15 IST

नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती मुख्यालयाच्या कामकाजात ३१ मार्चपर्यंत बदल करण्यात आला असून, या कालावधीत काही विभाग पूर्णत: बंद ठेवून अन्य कार्यालयांमध्ये केवळ ५ टक्केच कर्मचारी उपस्थित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : आरोग्य विभाग सुरू; पाच विभागांचे कामकाज बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती मुख्यालयाच्या कामकाजात ३१ मार्चपर्यंत बदल करण्यात आला असून, या कालावधीत काही विभाग पूर्णत: बंद ठेवून अन्य कार्यालयांमध्ये केवळ ५ टक्केच कर्मचारी उपस्थित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती, ग्रामपंचायत कार्यालय येथे जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ मार्चपर्यंत कार्यालयात ५ टक्केच उपस्थिती ठेवण्याचे निर्देश दिले असून, अभ्यागतांना प्रतिबंध करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हा परिषद मुख्यालय व पंचायत समिती स्तरावर ५ टक्के उपस्थितीबाबतचे निर्देश देतानाच सार्वजनिक प्रशासन विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, समाज कल्याण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हे विभाग ३१ मार्चपर्यंत पूर्ण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत अत्यावश्यक आरोग्य सेवा व प्रशासनाने आदेशीत केलेल्या अत्यावश्यक सेवा कार्यरत राहणार असून, अत्यावश्यक सेवेचे काम असल्यास लोकप्रतिनिधी व सरकारी अधिकाऱ्यांनी दूरध्वनी, भ्रमणध्वनी व ई-मेलद्वारे संदेश वहन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.नाशिक जिल्हा परिषद, मुख्यालयात जिल्हा परिषद पदाधिकाºयासह सर्व लोकप्रतिनिधी व अभ्यागतांना भेटीसाठी येण्यास टाळण्याचे आवाहन करण्यात आले असून, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी नाशिक जिल्हा मुख्यालय, पंचायत समिती मुख्यालय व ग्रामपंचायत कार्यालय येथे जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.ग्रामपंचायततर्फे जनजागृतीकोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ग्रामपंचायतीत जनजागृतीपर फलक लावण्यात येत आहेत, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत यांच्यामार्फत नागरिकांना विविध सूचना दिल्या जात आहेत. यात प्रामुख्याने हात धुण्याविषयी व गर्दी न करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात येत असून, ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. शासकीय रुग्णालय स्तरावर आवश्यक औषधी व साधनसामग्री उपलब्ध करण्यात आलेली असून, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी प्रशासन स्तरावरून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्यzpजिल्हा परिषद