शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पायरवाडी जिल्हा परिषद शाळेचे पालटले रूपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 18:04 IST

देवगाव : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा केंद्र शाळेच्या अंतर्गत येणारी वाळविहीर हद्दीतील जि.प. शाळा, पायरवाडीचा कायापालट शिक्षकांनी स्वखर्चाने करून शाळा डिजिटल करण्याचा प्रयत्न केला आहे.

ठळक मुद्देशुभ वर्तमान : शिक्षकांनी स्वखर्चाने केली शाळा डिजिटल

देवगाव : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा केंद्र शाळेच्या अंतर्गत येणारी वाळविहीर हद्दीतील जि.प. शाळा, पायरवाडीचा कायापालट शिक्षकांनी स्वखर्चाने करून शाळा डिजिटल करण्याचा प्रयत्न केला आहे.

येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विजय खादे आणि सहशिक्षक राधाकिसन रोंगटे व ग्रामपंचायत वाळविहीर यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी तसेच मनोरंजनातून अध्यापन आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी स्वखर्चाने शाळा रंगरंगोटी करून शाळा परिसर निर्मळ करण्याचा प्रयत्न केला आहे.कोरोना महामारीच्या ताळेबंदीत राज्यातील शाळा आठ ते नऊ महिने बंद आहेत. या काळात येथील मुख्याध्यापक व शिक्षकाने ग्रामपंचायतीच्या आर्थिक साहाय्यातून व स्वखर्चातून दररोज येऊन शाळा सुधरवण्याचे काम युद्धपातळीवर केले. वैतरणा- घोटी या मुख्य मार्गापासून ७ कि.मी. आणि वाळविहीरपासून दीड कि.मी. असलेल्या पायरवाडी शाळेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे; परंतु येथील कृतिशील शिक्षकांनी आणि ग्रामपंचायतीच्या मदतीने येथील शाळा डिजिटल केली. ग्रामीण आणि अतिदुर्गम भागात पायरवाडी जिल्हा परिषद शाळा १ ते ४ थीचे वर्ग असून, शाळेला नैसर्गिक सौंदर्याची साथ लाभली असून, स्पर्धेच्या युगात शाळेला नावीन्य प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने शिक्षकांनी स्वखर्चातून वर्ग सजावट करून शाळेची रंगरंगोटी केली आहे.

 ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून शाळेला ३२ इंची स्मार्ट एलईडी टीव्ही संच देण्यात आला आहे. नैसर्गिक सौंदर्य लाभलेला परिसर व रंगरंगोटीमुळे शाळेचे रूपडेच पालटले. शाळेतील विद्यार्थी व पालक यांच्या नियमित शौचालय वापराबरोबरच परिसर, वैयक्तिक स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात येऊ लागले. शाळेच्या परिसरात वृक्षलागवड, मध्यान्ह भोजन भोजनकक्ष यासारख्या भौतिक सुविधांबरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठीही शिक्षकांचे प्रयत्न आहेत. ग्रामस्थांनी मुलांच्या भवितव्याचा विचार आणि शाळेचे बदलते स्वरूप पाहता शिक्षकांना सहकार्य करण्याचा विडा उचलला.           मुख्याध्यापक खादे व सहशिक्षक रोंगटे यांनी शाळेकरिता प्रत्येकी पंधरा हजार व ग्रामपंचायत निधीतून वीस हजार अशा पन्नास हजारांत शाळा डिजिटल करण्याचे काम करून शाळेचा चेहरामोहराच बदलून टाकला. यासाठी वाळविहीर ग्रामपंचायतचे सरपंच सुनील ठाकरे व ग्रामसेविका श्रीमती एस.पी. चव्हाण यांनी सहकार्य केले. शिक्षकांनी स्वखर्चाने केलेल्या डिजिटल शाळेचे कौतुक गटशिक्षणाधिकारी माधुरी कांबळे, बीट विस्तार अधिकारी शिवाजी अहिरे, केंद्रप्रमुख राजेंद्र नांदूरकर आदींनी केले.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाEducationशिक्षण