शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

लाट की परिवर्तन; आज होणार फैसला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 00:53 IST

Maharashtra Assembly Election 2019गेल्या दोन निवडणुकांत भावनेच्या लाटेवर स्वार होऊनच मतदान करणाऱ्या शहरातील मतदारांचा कौल यंदा कोणाला मिळणार याचा फैसला गुरुवारी (दि.२४) होणार आहे. शहरातील चार पैकी तीन मतदारसंघांत दोन्ही वेळा याच पद्धतीने मतदारांनी मतदान केल्याने यंदा पुन्हा लाट की परिवर्तन याचा निर्णयच मतमोजणीत होणार आहे.

नाशिक : गेल्या दोन निवडणुकांत भावनेच्या लाटेवर स्वार होऊनच मतदान करणाऱ्या शहरातील मतदारांचा कौल यंदा कोणाला मिळणार याचा फैसला गुरुवारी (दि.२४) होणार आहे. शहरातील चार पैकी तीन मतदारसंघांत दोन्ही वेळा याच पद्धतीने मतदारांनी मतदान केल्याने यंदा पुन्हा लाट की परिवर्तन याचा निर्णयच मतमोजणीत होणार आहे.नाशिक शहरात नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य आणि देवळाली असे चार मतदारसंघ असून, यंदा सर्वच मतदारसंघांत विशेष चुरस होती. २००९ मध्ये नाशिक शहरातील चार पैकी नाशिक पूर्व, पश्चिम, मध्य या तीन मतदारसंघांवर मनसेने प्रथमच झेंडा फडकावला होता. त्यामुळे प्रस्थापितांना धक्का बसला होता. राज ठाकरे यांच्या नव्या पक्षाच्या भावनेवर नाशिककर स्वार झाले होते. २०१४ मध्ये अशाच प्रकारे मोदी लाटेच्या भावनेवर स्वार होत तिन्ही मतदारसंघांत भाजपाचे तीन आमदार निवडून दिले होते. यंदा भाजपा बरोबरच शेवटच्या टप्प्यात राष्टÑवादीनेदेखील जोरदार प्रयत्न केल्याने लाट की परिवर्तन हे मतदार ठरविणार आहेत.नाशिक पूर्वमध्ये भाजपामध्ये नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर मनसेतून आलेल्या अ‍ॅड. राहुल ढिकले यांना उमेदवारी देण्यात आली तर उमेदवारी नाकारल्याने बाळासाहेब सानप यांनी राष्टÑवादीचे घड्याळ मनगटावर बांधले. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली. परंतु मतदान झाल्यानंतरदेखील कोणीच या मतदारसंघाविषयी खात्री देऊ शकत नाही. मध्यमध्ये आमदार देवयानी फरांदे यांना उमेदवारी सहज मिळाली. मात्र कॉँग्रेस- राष्टÑवादी आणि मनसे असे उभय पक्षांचे आव्हान उभे ठाकले. त्यातच सर्वच पक्षात  फाटाफूट झाली आहे. त्यामुळे मतदार कोणाला कौल देतात ते महत्त्वाचे आहे.नाशिक पश्चिम मतदारसंघात यंदा सर्वाधिक राजकीय घडामोडी घडल्या. भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांच्यासमोर मित्रपक्ष शिवसेनेनेच बंड करून आव्हान उभे केले. हा मतदारसंघ शिवसेनेला मिळाला नाही म्हणून पक्षानेच बंडखोर विलास शिंदे यांना पुरस्कृत केले असल्याचे चित्र उभे राहिले. शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी राजीनामा देऊन वापरलेल्या दबावतंत्रानंतर भाजपानेदेखील त्यांच्या भरवशावर न राहता स्वबळावरच निवडणूक लढविली. तथापि, राष्टÑवादीचे उमेदवार डॉ. अपूर्व हिरे यांनी त्यांचीच नव्हे तर सर्वच उमेदवारांची दमछाक केली. त्यातच मनसेने उमेदवार दिलीप दातीर यांच्या उमेदवारीनेदेखील रंगत आणली. त्यामुळे या मतदारसंघातील निकालदेखील लक्षवेधी असणार आहे.देवळाली मतदारसंघात घोलप कुटुंबीयांपैकी विद्यमान आमदार डॉ. योगेश घोलप यांना तीस वर्षांत प्रथमच तुल्यबळ आव्हान उभे करण्यात विरोधकांना यश मिळाले, असे सांगितले जाते. भाजपाच्या नगरसेविका असलेल्या डॉ. सरोज आहिरे यांनी राष्टÑवादीकडून उमेदवारी करताना बºयापैकी घोलप यांची दमछाक केली. त्यातच ऐनवेळी मनसेत दाखल झालेल्या सिद्धांत मंडाले यांनीदेखील रंगत आणली.मतदानाची टक्केवारी धडधड वाढविणारीनाशिक शहरात देवळाली मतदारसंघाचा अपवाद वगळला तर अन्य तीन मतदारसंघांत २०१४ च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी काही प्रमाणात घसरली आहे. नाशिक पूर्वमध्ये २०१४ मध्ये ५२.३८ टक्के इतके मतदान होते. यंंदा ते ५०.६६ टक्के इतके झाले. नाशिक पश्चिममध्ये २०१४ मध्ये ५१.७३ टक्के मतदान होेते. यंदा ते ५४.३४ टक्के इतके झाले. नाशिक मध्य मतदारसंघात तर जिल्ह्यात निच्चांकी मतदान झाले. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात ५१.७३ टक्के इतके मतदान झाले होते. त्या तुलनेत यंदा ४८.४० म्हणजे तीन टक्क्यांनी मतदान कमी झाले आहे. घसरलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार हे गुरुवारी (दि.२४) निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.मतमोजणी कक्षात अधिकृत व्यक्तींनाच प्रवेशमतमोजणीच्या ठिकाणी जाणाºया मतदान प्रतिनिधी आणि माध्यम प्रतिनिधींसाठी निवडणूक शाखेने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. त्यानुसार निवडणूक आयोगातर्फे अधिकृत प्रवेशिकेवरच प्रवेश दिला जाणार आहे. माध्यम प्रतिनिधींना, मीडिया सेंटर व्यतिरिक्त अन्यत्र मतमोजणी परिसरात कुठेही मोबाइलचा वापर करण्यास सक्त मनाई असणार आहे. मतमोजणी सुरू झाल्यानंतर मीडिया सेंटरमधून माध्यम अधिकारी, समन्वय अधिकारी यांच्यामार्फतच माध्यमांना मतमोजणी केंद्रात गाईडेड टूरसाठी प्रवेश दिला जाईल. माध्यमाच्या प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रात जाताना आपले मोबाइल मीडिया सेंटरमध्ये जमा करावे लागणार आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकElectionनिवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय