चांदवड : येथे योग विद्याधामच्या वतीने गुरुवार, दि. ३ सप्टेंबर ते ११ आॅक्टोबर या कालावधीत दररोज सकाळी ६ ते ७ या वेळेत लक्ष्मी लॉन्स मनमाडरोड येथे योगासने, प्राणायाम शिबिराचे (योग प्रवेशवर्ग) मोफत आयोजन केले असल्याची माहिती प्रशिक्षक ए. बी. येवला यांनी दिली. या शिबिरात भारतीय योग विद्याधाम, महाराष्ट्र व योग विद्या गुरुकुल येथील निसर्गोपचारतज्ज्ञ नीलेश वाघ, स्वाती मराठे यांचे व्याख्यान होणार आहेत. शिबिरात ओमकार साधना, पूरक हालचाली, सूर्यनमस्कार, योगासने व प्राणायाम इतर महत्त्वपूर्ण अभ्यासवर्ग घेतले जाणार आहते.. (वार्ताहर)
चांदवडला गुरुवारपासून योगासन व प्राणायाम शिबिर
By admin | Updated: September 2, 2015 23:16 IST