शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला कचऱ्याचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 00:16 IST

चांदवड : शहरातील सर्व गल्लीतील घाण, रिकाम्या बाटल्या, पालापाचोळा पावसाळ्यात वाहून शहराच्या बाहेर असलेल्या चांदवड मर्चण्ट बॅँक कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ येते.

चांदवड : शहरातील सर्व गल्लीतील घाण, रिकाम्या बाटल्या, पालापाचोळा पावसाळ्यात वाहून शहराच्या बाहेर असलेल्या चांदवड मर्चण्ट बॅँक कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ येते. तेथून पुढे खंडेराव मंदिराकडे जाणारा नाला नेहमीच दरवर्षी तुंबतो. त्यामुळे कॉलनीवासीयांना घाणीच्या साम्राज्यात राहावे लागते. ही बाब नगर परिषदेच्या वेळोवेळी लक्षात आणून देऊनही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप चांमको बॅँक कॉलनीतील नागरिकांनी केला आहे. यावेळी पवन प्रचापत, बाळा सोनवणे, रोहित देव, सोनू शहा, बाळासाहेब ठाकरे, पारसमल लुणावत, हैदर घाशी, बाळासाहेब राहाणे, गणेश होणराव व नागरिकांनी तक्रार केली आहे.----------------------स्वच्छता, संरक्षकभिंतीची मागणीशहरातील हत्तीखाना परिसरामध्ये स्वच्छता व अतिक्रमण काढून परिसराला संरक्षण भिंत करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी चांदवड नगर परिषदेचे अभियंता अनिल कुरे, संजय गुरव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी राहुल जाधव, गणेश लहरे, विवेक जाधव, नीलेश पवार, दीपक देवरे, चेतन ढोमसे व परिसरातील नागरिकांनी निवेदन दिले़परिसरात अनेक ठिकाणी काटेरी झाडे, बाभूळ आहेत. ती तोडण्यात यावी तसेच या परिसरात मोठ मोठे कचरा ढीग पडले असून कचरा कुंडी ठेवण्याची मागणी निवेदनात केली आहे. नितीन जाधव, भूषण उशीर, शेखर बिल्लाडे उपस्थित होते़--------------------------शहरात स्वच्छतेचा मोठा गाजावाजा होत असताना स्वच्छतेवर लाखो रुपये नगर परिषद खर्च करत आहे. याला चांमको बँक कॉलनी अपवाद आहे. येथे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची माहिती योगेश अजमेरा, सुरेश देशमुख, नितीन थोरे व परिसरातील नागरिकांनी दिली. कॉलनीवासीयांनी वारंवार सांगूनही नगर परिषदेचे कर्मचारी दखल घेत नाहीत.-----------------------------कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता राखणे गरजे असताना नगर परिषद याकडे का दुर्लक्ष करते असा प्रश्न पडला. तात्काळ याबाबत साफसफाई न झाल्यास कॉलनीवासीय साफसफाई कर भरणार नाही व नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्यास याला नगर परिषद जबाबदार राहील, असे कॉलनीवासीयांनी सांगितले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक