वकीलने दि. २३ जुलै मध्यरात्रीपासून ते सकाळी सात वाजेदरम्यान परिसरातील वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
नासरीबाई सदू चौहाण (रा. सांगवी, पोस्ट राजपूर, जि. बडवाणी) हे हल्ली मजूर कामासाठी चांदवड देवीहट्टी येथे भाचा वकील सुकलाल जमरे यांच्यासह राहत होते. रात्रीच्या वेळी वकील याने वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी सांगितली. त्यास झाडावरून उतरवून चांदवड उपजिल्हा रुग्णालयात नेले. याबाबतची फिर्याद नासरीबाई यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख करीत आहेत.
------------------------------------------------
चांदवडला एक दिवसात आठ बाधित
चांदवड : येथे दि. २४ जुलै रोजी घेतलेल्या ६० पैकी ६ अहवाल, तर दि. २४ जुलै रोजी घेतलेल्या ३७५ पैकी २ अहवाल असे एकूण आठ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दिघवद एक, वागदर्डी दोन , मंगरूळ येथील दोन, रेडगाव खुर्द एक, वडाळीभोई एक, चांदवड रंगमहालजवळ एक असे एकूण आठ जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाने दिली .