चांदोरी चा युवक बनला नायब तहसीलदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 06:03 PM2020-06-23T18:03:58+5:302020-06-23T18:04:46+5:30

चांदोरी : नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, त्यात निफाड तालुक्यातील चांदोरी येथील प्रमोद सावंत याने नायब तहसीलदार पदला गवसणी घातली आहे.

Chandori's youth became Deputy Tehsildar | चांदोरी चा युवक बनला नायब तहसीलदार

प्रमोद सावंत, नायब तहसीलदार

googlenewsNext
ठळक मुद्देआपल्या प्रयत्नावर विश्वास ठेऊन अभ्यास करत रहावे.

चांदोरी : नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, त्यात निफाड तालुक्यातील चांदोरी येथील प्रमोद सावंत याने नायब तहसीलदार पदला गवसणी घातली आहे.
प्रमोद यांनी आपले प्राथमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये पूर्ण केले त्यानंतर पदवी साठी त्यानी अभियांत्रिकी विभागात मुंबई येथे पदवी व पद्युत्तरचे शिक्षण पूर्ण केले.महाविद्यालयाच्या अभ्यासा सोबत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास सुरु केला त्यात सलग चार वर्ष त्यांनी पूर्व परीक्षा पार करत मुख्य परीक्षेस पात्र झाले, त्या नंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या अभ्यास सुरु केला. पिहल्याच प्रयत्नात २०१९ मध्ये दिलेल्या परीक्षेत नायब तहसीलदार पदाला पात्र ठरला आहे. त्यांनी नाशिक व दिल्ली येथे वाचनालयात जाऊन अभ्यास केला आहे. प्रमोदचे वडील निवृत्ती सावंत हे शेतकरी व आई मंगल गृहिणी आहे. त्यांनी मिळवल्या यशाबद्दल चांदोरी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

वडील शेतकरी आहे. नेहमी मनात अधिकारी होण्याचे स्वप्न होते,तसेच नेहमी लोकपयोगी कामे करता येईल व त्यातून आदर मिळेल अशी नोकरी असावी असे नेहमी वाटत होते आज ते स्वप्न पूर्ण झाल्याने आनंद वाटत आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरु णांनी अभ्यासात सातत्य ठेवावे व आपल्या प्रयत्नावर विश्वास ठेऊन अभ्यास करत रहावे.
- प्रमोद सावंत. (फोटो २३ प्रमोद)

Web Title: Chandori's youth became Deputy Tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.