शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

चांदोरीपाठोपाठ सायखेड्यात बनावट दारूअड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 22:12 IST

ओझर : निफाड तालुक्यातील चांदोरी येथील एका लॉन्समध्ये बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केल्याच्या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच, उत्पादन शुल्क विभागाने सायखेड्यातही कारवाई करीत ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, कारवाई झालेले दोन्हीही कारखाने हे संजय दाते यांचे असून, ग्रामीण पोलिसांनी त्यांना चांदोरीतील कारवाईत ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : ५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

ओझर : निफाड तालुक्यातील चांदोरी येथील एका लॉन्समध्ये बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केल्याच्या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच, उत्पादन शुल्क विभागाने सायखेड्यातही कारवाई करीत ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, कारवाई झालेले दोन्हीही कारखाने हे संजय दाते यांचे असून, ग्रामीण पोलिसांनी त्यांना चांदोरीतील कारवाईत ताब्यात घेतले आहे.निफाड तालुक्यातील नाशिक-औरंगाबाद राज्यमार्गावर असलेल्या चांदोरी शिवारात उदयराजे लॉन्समध्ये अवैधरीत्या सुरू असलेला बनावट देशी दारूचा कारखाना नाशिक ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला. सोमवारी (दि. ११) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास केलेल्या या कारवाईत सुमारे एक कोटीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.या कारवाईनंतर लगेचच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोहर अंजुळे यांना मिळालेल्या माहितीवरून उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सायखेड्यात छापा टाकला. दरम्यान, धुळ्यातील गुन्हेगार दिनेश गायकवाड ऊर्फ दिनू डॉन हा बनावट दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचं पुढे आले आहे. त्याच्यावर ह्यमोक्काह्णअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई झालेली आहे.मिळालेल्या माहितीवरून आम्ही हा छापा टाकला. त्यात स्पिरिट, बाटल्यांची झाकणं, बॅरल्स असा सुमारे ५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणात दिनेश गायकवाड ऊर्फ दिनू डॉन या प्रमुख संशयितांचे नाव पुढे आले आहे. तो धुळ्याचा असून, त्याच्यावर धुळ्यात ह्यमोक्काह्णन्वये स्थानबद्धतेची कारवाईदेखील झालेली आहे.झ्र मनोहर अंचुळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, नाशिक

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी