शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

चंदनचोरांची टोळी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:53 IST

शहरासह उपनगरांमध्ये चंदन वृक्षांची चोरी करणाऱ्या चार संशयितांच्या टोळीला मुंबईनाका पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी विविध ठिकाणांवरून चंदनाची झाडे कापून नेल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.

नाशिक : शहरासह उपनगरांमध्ये चंदन वृक्षांची चोरी करणाऱ्या चार संशयितांच्या टोळीला मुंबईनाका पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी विविध ठिकाणांवरून चंदनाची झाडे कापून नेल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, गंगापूररोड आदी भागांमध्ये असलेले चंदनाचे वृक्ष शोधून ती रात्रीच्या अंधारात इलेक्ट्रिक कटरने कापून लंपास करण्याच्या घटना मागील काही महिन्यांमध्ये उघडकीस आल्या होत्या. त्यानंतर तिडके कॉलनी परिसरातील चांडक सर्कल भागात असलेल्या एका बंगल्याच्या आवारातून चंदनवृक्ष कापून लंपास करीत असल्याची बाब एका फार्म हाउसवरील सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आली. त्याने चंदनचोरांना हटकले असता चोरट्यांनी त्यास मारहाण करून चंदनवृक्ष घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संजय माणिक जाधव (२२, रा. दत्त मंदिर), विजय शंकर गायकवाड (२२, सातपूर), रामा विलास कोळी (४०, रा. अंबड-लिंकरोड), लक्ष्मणतात्या पवार (२२, रा. शेणीतगाव, घोटीरोड) या संशयितांना चंदनचोरीप्रकरणी ताब्यात घेतले आहे.दरम्यान, हवालदार भिसे यांना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास संशयित तिडके कॉलनी परिसरात संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून चौघांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी तिडके कॉलनीतील गुन्ह्याची कबुली देतानाच, याच टोळीने नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंदनाची झाडे तोडल्याचीही कबुली दिली आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल आहे. संशयितांकडून आणखीही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस