नाशिक : गंगापूररोड परिसरातील एका लॉन्समधील चंदनाचे ४ फूट उंचीचे झाड तीन अज्ञात चोरट्यांनी कापून चोरून नेल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी चोरट्यांनी चोरलेले चंदन लाकूड पोलिसांच्या हाती लागले असले तरी संशयित चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले.मधुकर यादव सोसळे (रा. शेरी मळा, पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात सुमारे पाच हजार रुपये किमतीचे चंदनाचे झाड चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारवाडा ठाण्याचे बीट मार्शल भगवान गवळी व होमगार्ड आर. एम. शिंदे रात्री १ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कर्तव्यावर असताना त्यांना पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास चोपडा लॉन्स परिसरातून तीन इसम डोक्यावर मोठे गाठोडे घेऊन जात असताना दिसले. गवळी यांनी त्यांचा पाठलाग केला असता, संशयितांनी गाठोडे चोपडा लॉन्सलगतच्या नदीकाठी फेकून देत पळ काढला.यावेळी गवळी यांनी गाठोडे ताब्यात घेतले. त्यात सुमारे २० ते २५ किलो वजनाचे चंदनाचे लाकूड व कुºहाड आढळून आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
गंगापूररोड परिसरातून चंदन चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 22:14 IST
नाशिक : गंगापूररोड परिसरातील एका लॉन्समधील चंदनाचे ४ फूट उंचीचे झाड तीन अज्ञात चोरट्यांनी कापून चोरून नेल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी चोरट्यांनी चोरलेले चंदन लाकूड पोलिसांच्या हाती लागले असले तरी संशयित चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले.
गंगापूररोड परिसरातून चंदन चोरी
ठळक मुद्देलाकूड सापडले : चंदनचोर पळ काढण्यात यशस्वी