नाशिक : म्हसरूळ शिवारातील चामारलेणी येथे फिरण्यासाठी गेलेल्या पंचवटीतील चौघा युवकांना चौघा संशयित आरोपींना बेदम मारहाण करून पिस्तुलाचा धाक दाखवून त्यातील पाच आयफोन तसेच अंगावरील साडे पाच तोळ्याचे दागिने असा जवळपास २ लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज काढून घेतल्याची घटना घडली. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात चौघा संशयितांविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या जबरी चोरीप्रकरणी पंचवटीतील विजयनगर कॉलनी येथे राहणाऱ्या ब्रज अक्षय शहा याने म्हसरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ब्रज शहा मित्र मित माजेठिया आणि सिद्धांत शर्मा असे पेठरोडवर चांभार लेणी येथे फिरण्यासाठी गेले होते. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास मित्र चामारलेणी पायथ्याशी लोखंडी शेड जवळ फोटो काढत असताना उंचीने कमी असलेला गळ्यात हस्तीदंतासारखे ताईत घातलेला एक संशयित आला व त्याने पिस्तूल दाखविले. त्यानंतर त्याने अन्य साथीदारांच्या मदतीने शहा आणि त्याच्या मित्रांना शिवीगाळ मारहाण करत शहा व त्याच्या मित्रांच्या अंगावरील हातातील सोन्याचे ब्रेसलेट चैन असे पावणे दोन लाख रुपयांचे साडेपाच तोळ्यांचे दागिने आणि ९० हजार रुपये किंमतीचे एकूण पाच आयफोन तसेच खिशातील पंधराशे रुपये रोकड जबरीने काढून घेत संशयितांनी घटनास्थळाहून पलायन केले तर घटना घडल्यानंतर घाबरलेल्या युवकांनी तत्काळ म्हसरूळ पोलीस ठाणे गाठत झाल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी करून संशयितांचा शोध घेण्यासाठी गुन्हा शाखेच्या पोलिसांना आदेश दिले आहेत.
चामरलेणी : पिस्तुलचा धाक दाखवून जबरी लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 14:55 IST
हातातील सोन्याचे ब्रेसलेट चैन असे पावणे दोन लाख रुपयांचे साडेपाच तोळ्यांचे दागिने आणि ९० हजार रुपये किंमतीचे एकूण पाच आयफोन तसेच खिशातील पंधराशे रुपये रोकड जबरीने काढून घेत संशयितांनी घटनास्थळाहून पलायन केले
चामरलेणी : पिस्तुलचा धाक दाखवून जबरी लूट
ठळक मुद्देसोन्याच्या दागिन्यांसह पाच मोबाईलवर डल्ला