शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापनात मानधनावर भरतीस आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:05 IST

महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने ९० कर्मचारी मानधनावर भरण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावास सीटूप्रणित नाशिक महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने विरोध करण्यात आला आहे.

नाशिक : महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने ९० कर्मचारी मानधनावर भरण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावास सीटूप्रणित नाशिक महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. त्याचबरोबर महापालिकेने सरळ सेवा पद्धतीने कायमस्वरूपी भरती करावी, अशी मागणी करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन विभाग केवळ आपत्तीतच नव्हे तर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबतदेखील दक्ष असतो अशावेळी मानधनावरील कर्मचारी नियुक्त करणे अयोग्य असल्याचेदेखील संघटनेने पत्रात नमूद केले आहे.महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन (अग्निशमन दल) विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. लवकरच पावसाळा सुरू होत असून, त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आता या विभागासाठी ९० कर्मचारी मानधनवर भरती करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर संघटनेने आयुक्तांना पत्र दिले असून, त्यात मानधनावर भरती करण्यास विरोध केला आहे. केंद्र शासनाच्या संरक्षण दलानुसारच आपत्ती व्यवस्थापन विभाग सदैव सज्ज असतो. अत्यंत जबाबदारी आणि जोखमीचे हे काम असते. आग आणि पावसाळाच नव्हे तर भूकंपासारख्या आपत्तीतदेखील कर्मचारी काम करतात. दंगलीतदेखील या विभागाचे कर्मचारी काम करतात. कित्येकदा राष्टÑीयदृष्ट्या महत्त्वाच्या तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थेतदेखील या दलाचे कर्मचारी नियोजनापासूनच सहभागी असतात. त्यामुळे याठिकाणी जबाबदार कर्मचारी कायमस्वरूपीच नेमले पाहिजे, असे संघटनेने नमूद केले आहे.विशेष म्हणजे महापालिकेच्या वतीने गेल्या वर्षी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या विभागात कर्मचारी भरतीचा प्रस्ताव पाठविला होताच, परंतु कायम पदासंदर्भातील आकृतिबंध राज्य शासनाकडे प्रलंबित आहे.सरळ सेवा पद्धतीने भरती राबवावीनागपूर, नवी मुंबई आणि मीरा भार्इंदर यांसारख्या महापालिकांचे आकृतिबंध शासनाने मंजूर केले आहेत, मग नाशिक महापालिकेचा आकृतिबंध मंजूर का होत नाही, असा प्रश्न करीत शासनाकडे पाठपुरावा करून हा आकृतिबंध मंजूर करावा आणि तातडीने सरळ सेवा पद्धतीने कर्मचारी भरती मोहीम राबवावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, अ‍ॅॅड. तानाजी आगलावे, जगदीश देशमुख, एस. एस. आगलावे, पी. जी. लहामगे यांनी केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक