शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीसाठी मनसेला शिवसेना-भाजपाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:02 IST

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ (क) मधील पोटनिवडणुकीसाठी दाखल झालेल्या सर्व ११ उमेदवारांचे अर्ज बुधवारी (दि.२१) झालेल्या छाननीत वैध ठरविण्यात आले. दिवंगत नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या कुटुंबीयांकडून बिनविरोध निवडीचे प्रयत्न फोल ठरल्यानंतर मनसेपुढे सेना-भाजपाने तगडे आव्हान उभे केले आहे.

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ (क) मधील पोटनिवडणुकीसाठी दाखल झालेल्या सर्व ११ उमेदवारांचे अर्ज बुधवारी (दि.२१) झालेल्या छाननीत वैध ठरविण्यात आले. दिवंगत नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या कुटुंबीयांकडून बिनविरोध निवडीचे प्रयत्न फोल ठरल्यानंतर मनसेपुढे सेना-भाजपाने तगडे आव्हान उभे केले आहे. मनसेला कॉँग्रेस-राष्टÑवादीने पाठबळ दिल्याने पोटनिवडणुकीत चुरशीचा सामना बघायला मिळणार आहे. प्रभाग क्रमांक १३ (क) मधील पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून स्नेहल संजय चव्हाण, मनसेकडून अ‍ॅड. वैशाली मनोज भोसले तसेच डमी म्हणून रश्मी सचिन भोसले, भाजपाकडून विजया हरिष लोणारी तर डमी म्हणून कीर्ती प्रतीक शुक्ल या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर अपक्ष म्हणून ज्योती नागराज पाटील, समीना कयुम पठाण, अवंतिका किशोर घोडके, माजी नगरसेवक माधुरी मिलिंद जाधव, माजी नगरसेवक रंजना ज्ञानेश्वर पवार आणि समीना मकसूद खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी (दि.२१) सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी रोहिदास बहिरम यांच्यासमोर प्राप्त अर्जांची छाननी करण्यात आली. यावेळी सर्व उमेदवार उपस्थित होते. अर्जावर पुराव्यानिशी आक्षेप घेण्याची सूचना निवडणूक अधिकाऱ्यांनी केली परंतु, एकानेही आक्षेप नोंदविला नाही. त्यामुळे सर्वच्या सर्व ११ अर्ज वैध ठरविण्यात आले. आता दि. २३ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.राज यांच्या सभेची शक्यता?एखादा लोकप्रतिनिधी दिवंगत झाल्यानंतर त्याच्या जागेवर होणारी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे संकेत आहेत. परंतु, सेना-भाजपाने केलेली प्रतिष्ठा पाहता निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे मनसेची स्थिती अवघड बनली आहे. मनसे उमेदवाराच्या प्रचारासाठी खुद्द राज ठाकरे यांची एखादी सभा प्रभागात लावली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :MNSमनसेElectionनिवडणूक