शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: नाशिकमध्ये ऐन गणेशोत्सवात हेल्मेटधारी चेन स्नॅचर्सचा धुमाकूळ; सहा दिवसांत सहा घटना

By अझहर शेख | Updated: September 6, 2022 14:57 IST

शहरात ऐन गणेशोत्सवात हेल्मेटधारी चेन स्नॅचर्सकडून धुमाकूळ घातला जात आहे.

नाशिक :

शहरात ऐन गणेशोत्सवात हेल्मेटधारी चेन स्नॅचर्सकडून धुमाकूळ घातला जात आहे. सणासुदीच्या काळात महिला दागिने परिधान करुन घराबाहेर पडतात, यामुळे सोनसाखळी चोर सक्रीय झाले आहे. टाकळीरोडनंतर सोमवारी (दि.५) सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास येवलेकर मळा-विसेमळा रस्त्यावर एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली.

गणेशोत्सवात शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून गस्तदेखील वाढविण्यात आली आहे. तरीही सोनसाखळी चोर सर्रासपणे वृद्ध महिलांना वेगवेगळ्या भागात लक्ष्य करत आहेत. सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास संध्या राघवेंद्र अंकलगी (६६,रा. आनंदवन कॉलनी, कॉलेजरोड) या पायी जात होत्या. यावेळी त्यांच्यासमोरून काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीने दोघे संशयित तरुण आले. त्यांनी अंकलगी यांच्या उजव्या बाजूने दुचाकी घेऊन काही सेकंद थांबले आणि पाठीमागे बसलेल्या संशयित चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ४ तोळे वजनाचे मंगळसुत्र हिसकावून पोबारा केला. दुचाकीचालकाने डोक्यात हेल्मेट परिधान केलेले होते. त्याच्या पाठीमागे बसलेल्या युवकाने डोक्यात टोपी घातलेली व गळ्यात लहान बॅग अडकविलेली होती. ही संपुर्ण घटना येथील एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सोनसाखळी हिसकावल्याचे लक्षात येताच अंकलगी यांनी आरडाओरड केली व त्यांच्या पाठीमागे धाव घेतली. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या दोन तरुणांच्याही हा प्रकार लक्षात आला. त्यांनी वृद्धेला विचारले असता त्वरित त्या दिशेने दुचाकीने पाठलाग केला मात्र दोघे सोनसाखळी चोर बॉईज टाऊन शाळेपासून नेमके कुठल्या दिशेने गेले ते लक्षात येऊ शकले नाही.याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनसाखळी चोरांनी पुन्हा एकदा भद्रकालीसह सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकांना आव्हान दिल्याचे बोलले जात आहे

वृद्ध महिला ‘सॉफ्ट टार्गेट’येवलेकर मळ्यासह टाकळीरोडवरच्या घटनेतही वृद्ध महिलेला लक्ष्य करण्यात आले. टाकळीरोडवरून विनिता विलास भिंगे (६४,रा.जुनी पंडीत कॉलनी) पायी जात होत्या. यावेळी अचानकपणे दोन तरुण हे दुचाकीने त्यांच्याजवळ आले. त्यांनी डोक्यावर हेल्मेट परिधान केलेले होते. दुचाकीचालकाच्या पाठीमागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे तीन तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावली. रविवारी (दि.४) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात सोनसाखळी चोरांविरुद्ध जबरी लूटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :RobberyचोरीNashikनाशिक