शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनियरींगसाठी 13 ते 23 एप्रिलदरम्यान एमएचटी सीईटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 13:10 IST

विविध प्रकारच्या व्यावसायिक व तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असून, महाराष्ट्र राज्य प्रवेशपरीक्षा कक्षाने (सीईटी सेल) या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार १३ ते १७ एप्रिल व २० ते २३ एप्रिल २०२० या कालावधीत एमएचटी सीईटी परीक्षा होणार आहे.

ठळक मुद्देइंजिनिअरिंग,फार्मसी प्रवेशासाठी सीईटी अनिवार्यमार्च, एप्रिल, मे महिन्यात प्रवेश पत्रांचे सत्रइंजिनियरींगसाठी 13 ते 23 एप्रिलदरम्यान सीईटी एमबीए साठी १४ व १५ मार्चला प्रवेश परीक्षा

नाशिक : एमबीए, फार्मसी, इंजिनिअरिंग, हॉटेल मॅनेजमेंटसह विविध प्रकारच्या व्यावसायिक व तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असून, महाराष्ट्र राज्य प्रवेशपरीक्षा कक्षाने (सीईटी सेल) या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. 

महासीईटीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, इंजिनियरिंग, बी. टेक, बी. फार्मसी,  फार्म डी, कृषी पदवी, मत्सशास्त्र, दुग्ध तंत्रज्ञान आदी अभ्यासक्रमांसाठी १३ ते १७ एप्रिल व २० ते २३ एप्रिल २०२० या कालावधीत एमएचटी सीईटी परीक्षा होणार आहे. तर एमबीए आणि एमएमएस या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी १४ आणि १५ मार्च रोजी प्रवेशपरीक्षा होणार आहे. एमसीएसाठी २८ मार्चला प्रवेशपरीक्षा होणार आहे. एमएससी, हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी पदवी, स्थापत्य पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी १० मे व हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी १६ मे रोजी प्रवेशपरीक्षा होणार असल्याची माहिती राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे  संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षांच्या तारखांची पूर्वकल्पना यावी, यासाठी सीईटी सेलकडून उच्च शिक्षणाच्या आठ व्यावसायिक आणि तंत्रशिक्षणाच्या सहा अभ्यासक्रमांचे संभाव्य वेळापत्रक महिनाभरापूर्वीच जाहीर केले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थी