शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल योजनेतील नागरिकांना पोटाचे विकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:31 IST

वडाळा गावातील घरकुल योजनेसह परिसरात गेल्या दहा दिवसांपासून पावसाळ्यापूर्वीच दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना स्वखर्चाने शुद्ध पिण्याच्या पाण्याचा जार विकत आणून आपली तहान भागवावी लागत आहे.

इंदिरानगर : वडाळा गावातील घरकुल योजनेसह परिसरात गेल्या दहा दिवसांपासून पावसाळ्यापूर्वीच दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना स्वखर्चाने शुद्ध पिण्याच्या पाण्याचा जार विकत आणून आपली तहान भागवावी लागत आहे. या संदर्भात तक्रारी करूनही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे त्याकडे लक्ष न गेल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.या घरकुल योजनेत ७२० कुटुंबे वास्तव्यास आहेत. गेल्या दहा दिवसांपासून या परिसरात पाणीपुरवठा विभागाच्या वतीने दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी महापालिकेचे पाणी पिण्यास नकार देऊन आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता विकतचे पाणी आणून त्यावर आपली व कुटुंबीयांची तहान भागविण्यावर भर दिला आहे. काही नागरिकांना या दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार जडले असून, या संदर्भात महापालिकेकडे तक्रार करूनही दूषित पाणीपुरवठा बंद करण्यात आलेला नाही. दुसरीकडे विकतचे पाणी घेऊन तहान भागविताना गोरगरिब कुटुंबांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.गेल्या दहा दिवसांपासून घरकुल योजना परिसरात दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा केला जात असून, त्यामुळे नागरिकांना पोटाच्या विकारांना सामोरे जावे लागत आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे होत असलेल्या आर्थिक व मानसिक त्रासाने नागरिक त्रस्त झाले आहेत.- संतोष शिलावट

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका