शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यातील आराेग्य यंत्रणेची सीईओंकडून झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 01:17 IST

येवला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत चालले असतानाही त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून पाहिजे त्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग तसेच रुग्णांचा शोध घेतला जात नसल्याचे पाहून मंगळवारी जिल्हा  परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी चांगलीच झाडाझडती घेतली. 

ठळक मुद्देअधिकाऱ्याचा पदभार काढला : वैद्यकीय अधीक्षकांवर कारवाई

नाशिक : येवला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत चालले असतानाही त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून पाहिजे त्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग तसेच रुग्णांचा शोध घेतला जात नसल्याचे पाहून मंगळवारी जिल्हा  परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी चांगलीच झाडाझडती घेतली. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केल्याने त्यांचा पदभार तत्काळ काढण्यात आला, तर वैद्यकीय अधीक्षकांवरही कारवाई करण्याचे आदेश जागीच देण्यात आले.     नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, त्याला अटकाव करण्यासाठी आरोग्य यंत्रणा, ग्रामपंचायत विभागाला उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असूनही त्याचा फारसा परिणाम दिसत नसल्याचे पाहून मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी येवला येथे अचानक भेट देऊन अधिकाऱ्यांची बैठक व काही ठिकाणांना भेट देऊन पाहणी केली. त्यात आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा निदर्शनास आल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांचा पदभार काढून घेत तो डॉ. कातकाडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात  आला, तर येवला ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कुप्पास्वामी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले. या दोघांबरोबरच नगरसूल येथील ग्रामीण रुग्णालयातील अधीक्षक डॉ.  सूर्यवंशी हेदेखील तडाख्यातून सुटले नाहीत. त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मास्कचा वापर व सुरक्षित अंतर पाळण्याबाबत ग्रामसेवकांनी दक्ष राहून मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, ग्रामसेवकांनी दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. हॉटस्पॉट ठरलेल्या नगरसूल ग्रामपंचायतीच्या हद्दीत अधिकाधिक रुग्ण तपासणी मोहीम राबविण्यात यावी व येवल्याच्या उपजिल्हा रुग्णालयात डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू करण्याच्या सूचनाही बनसोड यांनी दिल्या. बैठकीस प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते.अधिकाऱ्यांना केल्या विविध सूचनायावेळी घेण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत लीना बनसोड यांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची दररोज माहिती संकलित करून ती ऑनलाइन अपलोड करण्यात यावी, अशा व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या किमान ३० लोकांची रॅपिड ॲन्टिजेन तपासणी केली जावी, रुग्णाच्या रहिवास क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून त्यावर लक्ष केंद्रित करावे, नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानांवर कारवाई करावी, गृहविलिगीकरणात उपचार घेणाऱ्या प्रत्येक रुग्ण घरी आहे किंवा नाही याची खात्री करावी तसेच त्याच्याशी संपर्कात राहावे अशा व्यक्तींकडून नियमांचे उल्लंघन होत असेल तर तत्काळ त्याला कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. 

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदHealthआरोग्य