शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात  केंद्र सरकारचे प्रतीकात्मक पिंडदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:05 IST

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून केंद्र सरकारचे प्रतीकात्मक पिंडदान केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

नाशिक : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून केंद्र सरकारचे प्रतीकात्मक पिंडदान केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.  दररोज पेट्रोल व डिझेलची दरवाढ होत असून, सरकार याप्रश्नी नाकर्त्यांच्या भूमिकेत असल्याचा आरोप करीत आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडत ‘मोदी सरकार मुर्दाबाद’, ‘इंधन दरवाढ रद्द करा, नाही तर खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा देत केंद्र सरकारचे प्रतीकात्मक पिंडदान केले. यावेळी प्रतीकात्मक पिंड तयार करून ते रस्त्यावर मांडत मोदी सरकारच्या नावाने शिमगा करण्यात आला  व पिंडाचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या आंदोलनाने रस्त्याने जाणाºया येणाºयांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, कर्नाटक निवडणूक संपताच रोखण्यात आलेली इंधन दरवाढ पुन्हा सुरू झाली असून, १४ दिवसांत पेट्रोल ३.४९ पैसेतर डिझेल ३.३६ पैसे दराने महागले आहे. इंधनाची दरवाढ गेल्या दोन वर्षांतील सर्वांत मोठी दरवाढ असून, सरकारला महागाई कमी करण्याचा विसर पडला आहे. सर्वसामान्य जनता हवालदिल झाली असून, कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली आहे. महाराष्टÑाला लागून असलेल्या गुजरातमध्ये ८ ते १० रुपयांनी स्वस्त इंधन मिळते आहे. त्यामुळे सरकारने इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणून दरवाढ तत्काळ कमी करावी, अशी मागणी केली आहे. आंदोलनात नंदन भास्करे, आकाश कदम, सागर कुंदे, श्रेयांश सराफ, अतुल डुंबरे, कैलास कळमकर, संदेश टिळे, बापू गागरे, कपिल पवार, सौरभ पवार, प्रशांत बच्छाव, तेजस अहेर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Petrolपेट्रोलNCPराष्ट्रवादी काँग्रेस