शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकार, भांडवलदारांविरोधात हा श्रमिकांचा लढा : ढवळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 02:01 IST

नवीन कृषी कायदे शेतकरीविरोधी असून, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळण्याऐवजी त्याची लूट होईल, त्याचप्रमाणे करार शेती कायद्यामुळे भांडवलदारांना अपेक्षित उत्पादन मिळू शकले नाही, तर शेतकऱ्यांच्या जमिनीही भांडवलदार कंपन्यांच्या घशात जातील, अशा तरतुदी केंद्र सरकारने भाजप, आरएसएस आणि अडाणी, अंबानी यांसारख्या भांडवलदारांच्या दबावातून केल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांनी केला आहे. 

नाशिक : नवीन कृषी कायदे शेतकरीविरोधी असून, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळण्याऐवजी त्याची लूट होईल, त्याचप्रमाणे करार शेती कायद्यामुळे भांडवलदारांना अपेक्षित उत्पादन मिळू शकले नाही, तर शेतकऱ्यांच्या जमिनीही भांडवलदार कंपन्यांच्या घशात जातील, अशा तरतुदी केंद्र सरकारने भाजप, आरएसएस आणि अडाणी, अंबानी यांसारख्या भांडवलदारांच्या दबावातून केल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांनी केला आहे. हे कारस्थान आता शेतकरी, श्रमिकांच्या लक्षात आले असून, आता ही लढाई केंद्र सरकारसह भांडवल दारांविरोधात या देशातील श्रमिक अशी झाली असून, या शेतकऱ्यांचाच विजय निश्चित असल्याचा विश्वास केरळचे खासदार के. के. रागेश यांनी व्यक्त केला.नाशिकमध्ये जमलेल्या आंदोलकांना संबोधित करताना ते सोमवारी (दि.२३) बोलत होते. यावेळी त्यांनी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, दिल्लीत वेगवेगळ्या राज्यांतील शेतकऱ्यांनी दिल्लीत जाणारे पाचही राष्ट्रीय महामार्ग रोखले आहेत. त्यांच्या आंदोलनाला नाशिकधून निघणारे राज्यभरातील शेतकरी बळ देतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांच्यासोबत नरसय्या आडम,  जे. पी. गावीत, सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डी. एल. कराड, किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसान गुज्जर, सचिव अजित नवले, राजू देसले आदी विविध संघटनांच्या नेत्यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले.तीन हजार शेतकरी, कामगारांचा सहभागकेंद्र सरकारने आणलेले नवीन तीन कृषी उत्पादन, व्यापार आणि करार शेतीसंदर्भातील कायदे हे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप आंदोलकांनी केला त्याचप्रमाणे केंद्राने कामगारांच्या विरोधातही चार कायदे आणल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळेच या आंदोलनात सुमारे तीन हजारहून अधिक शेतकरी व कामगारांनी सहभाग नोंदविल्याची माहिती समन्वयकांनी दिली. तीन हजार शेतकरी, कामगारांचा सहभागकेंद्र सरकारने आणलेले नवीन तीन कृषी उत्पादन, व्यापार आणि करार शेतीसंदर्भातील कायदे हे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप आंदोलकांनी केला त्याचप्रमाणे केंद्राने कामगारांच्या विरोधातही चार कायदे आणल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळेच या आंदोलनात सुमारे तीन हजारहून अधिक शेतकरी व कामगारांनी सहभाग नोंदविल्याची माहिती समन्वयकांनी दिली.

टॅग्स :NashikनाशिकFarmer strikeशेतकरी संप