शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारने कांदा निर्यातमूल्य वाढविल्याने कळवणमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:29 IST

कांद्याचे निर्यातमूल्य ८५० डॉलर करण्याचा सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात असून, शहरी भागातील जनतेला खूश ठेवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी बांधवांच्या भावनांशी सरकार खेळते आहे. निर्यातमूल्य वाढल्याने व्यापारी बांधवांना कांदा निर्यातीसाठीच्या खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे देशांतर्गत विक्र ीस प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे बाजारभावात कांदा स्वस्त होईल असे गणित असल्याने कांदा निर्यातमूल्य वाढविल्याने कळवणमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्दे कांदा निर्यातीसाठीच्या खर्चात वाढ कांदा निर्यातीवर काही प्रमाणात बंधन कांदा उत्पादक शेतकरी संतप्त

कळवण : कांद्याचे निर्यातमूल्य ८५० डॉलर करण्याचा सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात असून, शहरी भागातील जनतेला खूश ठेवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी बांधवांच्या भावनांशी सरकार खेळते आहे. निर्यातमूल्य वाढल्याने व्यापारी बांधवांना कांदा निर्यातीसाठीच्या खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे देशांतर्गत विक्र ीस प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे बाजारभावात कांदा स्वस्त होईल असे गणित असल्याने कांदा निर्यातमूल्य वाढविल्याने कळवणमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.  किरकोळ बाजारातले कांद्याचे दर आणखी वाढू नयेत यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर प्रतिटन ८५० डॉलरची ईएमपी अर्थात निर्यातमूल्य आकारण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे कांदा निर्यातीवर काही प्रमाणात बंधन येणार आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले असून, गुजरातची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला असल्याचे सांगून अप्रत्यक्ष निर्यातबंदी केली असल्याने कांदा उत्पादक शेतकरीचे नुकसान होणार असल्याने निर्यातमूल्य वाढविणे चुकीचे आहे, असे मत कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार यांनी व्यक्त केले.  या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकºयांना त्याचा काही प्रमाणात फटका बसू शकतो. या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव स्थिर राहण्यास मदत होईल अशी आशा सरकारला वाटतेय. तर हा निर्णय शेतकरीविरोधी असल्याचे मत शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी व्यक्त केले.  यंदा कांद्याचं उत्पादन मुळातच कमी आणि त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने कांद्याचे बाजारभाव फारसे कमी होणार नाहीत असे कांदा व्यापारी हेमंत बोरसे व सुनील महाजन यांनी सांगितले.   केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कांद्यावरील किमान निर्यातमूल्य शून्यावरून थेट ८५० डॉलरपर्यंत वाढविण्याचा निर्णय गुरु वारी घेतल्याने गेल्या दोन वर्षांपासून कांद्यावर निर्यातमूल्य आकारले जात नव्हते. मात्र, वाणिज्य मंत्रालयाच्या गुरु वारच्या निर्णयामुळे कांद्याची निर्यात घटणार आहे. त्यामुळे कांद्याचे भाव कोसळण्याची भीती आहे.  - धनंजय पवार, सभापती, कळवण बाजार समितीजनतेला महाग कांदा खरेदी करावा लागू नये यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याने कांदा उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याला तेजी आली आहे. काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा ४४४० रु पये प्रतिक्विंटल भावाने विकला गेला. शेतकरी बांधवांना दोन पैसे मिळू लागल्याने हे सहन झाले नाही.  - रवींद्र देवरे, माजी सभापती, अर्थ समिती, जि. प

टॅग्स :Marketबाजारonionकांदा