शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी कळवणला सर्वपक्षीय आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 14:56 IST

कळवण : जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला भाव मिळू लागल्याने केंद्र सरकारच्या पोटात पोटसुळ उठला आहे. त्यामुळे केंद्राने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला असल्याची टीका करु न शेतकरी संघटनेसह कांदा उत्पादक संघटना व सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवत कळवण बस स्थानकाजवळ रस्त्यावर काही काळ ठिय्या मांडून रस्ता रोको आंदोलन केले.

ठळक मुद्देकांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट:बस स्थानकाजवळ ठिय्या मांडून रस्ता रोको

कळवण : जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला भाव मिळू लागल्याने केंद्र सरकारच्या पोटात पोटसुळ उठला आहे. त्यामुळे केंद्राने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला असल्याची टीका करु न शेतकरी संघटनेसह कांदा उत्पादक संघटना व सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवत कळवण बस स्थानकाजवळ रस्त्यावर काही काळ ठिय्या मांडून रस्ता रोको आंदोलन केले.शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, जेष्ठ नेते रविंद्र देवरे, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शेतकरी नेते शांताराम जाधव, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, कांदा उत्पादक संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास रौंदळ, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेसह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात भाषणबाजी करु न आंदोलन केले.केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने कळवण तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कांद्याचा पूर्ण हंगाम शेतकºयांचा वाया गेला असतांना फक्त २ ते ४ रु पये किलो भाव मिळत होता. शेतकºयांचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नव्हता, भाव मिळतील या अपेक्षेने कांदा साठवला तो ही चाळीत सडला. थोडाफार शिल्लक राहिला. त्याला समाधानकारक दर मिळतो आहे. पण, झालेलं नुकसान बघता, शेतकºयांच्या हातात काही राहणार नाही.त्यात निर्यात बंदीमुळे भाव पडले. तर शेतकºयांना मिळत असणाºया गवताच्या काडीचा आधारही जाईल आणि कांदा उत्पादक शेतकरी उध्वस्त होतील अशी भीती यावेळी उपस्थितमान्यवरांनी व्यक्त करु न निर्यात बंदी उठवावी अशी मागणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन देण्यात आले.रस्ता रोको आंदोलनात घनश्याम पवार, पोपट पवार, जितेंद्र पगार,भाऊसाहेब पवार, प्रदीप पगार, टिनू पगार, दादा जाधव, रामा पाटील, मधुकर वाघ, रमेश पाटील, जगन पाटील, प्रल्हाद देवरे, संदीप वाघ, गोरख देवरे, महेंद्र पवार, काशिनाथ गुंजाळ, दिलीप शेवाळे, अमोल रौंदळ, राहूल पवार, नितीन पवार, वैभव देवरे, नितीन खैरनार आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी