शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक न्यायालयात आरोपींच्या बचावासाठी केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 20:04 IST

विधी व सेवा प्राधिकरणाच्या वतीने यापूर्वीही हलाखीची परिस्थिती असलेले व खटल्यात वकील देऊ न शकणा-या आरोपींच्या बचावासाठी सरकारकडून वकील देण्याची तरतूद होती. त्यासाठी वकिलांची नेमणूक केली जाते व त्यांनी चालविलेल्या खटल्याच्या प्रमाणात मेहनताना दिला जात

ठळक मुद्देपायलट प्रोजेक्ट : चीफ काउन्सीलपदी अ‍ॅड. फारूख शेख

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : परिस्थितीने गरीब व गुन्ह्यात नकळत सहभागी झालेल्या दुर्बल घटकातील आरोपींच्या बचावासाठी केंद्र सरकारने डिफेन्स काउन्सीलचा प्रयोग देशपातळीवर राबविण्याचा निर्णय घेतला असून, त्याची सुरुवात नाशिकच्यान्यायालयापासून करण्यात आली आहे. प्रायोगिक पातळीवर राबविण्यात येणाऱ्या या चीफ डिफेन्स काउन्सीलपदी अ‍ॅड. फारूख शेख यांची नियुक्ती करण्यात आली असून, या काउन्सीलसाठी स्वतंत्र कार्यालय व कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यास न्यायालयाने मान्यता दिली आहे.

विधी व सेवा प्राधिकरणाच्या वतीने यापूर्वीही हलाखीची परिस्थिती असलेले व खटल्यात वकील देऊ न शकणा-या आरोपींच्या बचावासाठी सरकारकडून वकील देण्याची तरतूद होती. त्यासाठी वकिलांची नेमणूक केली जाते व त्यांनी चालविलेल्या खटल्याच्या प्रमाणात मेहनताना दिला जात होता. विधी व सेवा प्राधिकरणाच्या वतीने देण्यात येत असलेल्या या सुविधेचा अनेक आरोपींना लाभ घेतला असला तरी, आता त्याच धर्तीवर वरिष्ठ न्यायालयात (सेशन) चालणा-या गंभीर स्वरूपाच्या खटल्यांतील आरोपींनाही सरकारकडून बचावासाठी वकील देण्याची तरतूद करणारे चीफ डिफेन्स काउन्सीलची निर्मिती करण्याचा निर्णय देशपातळीवर घेण्यात आला आहे. या काउन्सीलवर नेमण्यात येणा-या वकिलांची गुणवत्ता, न्यायदानातील योगदान आदी बाबी विचारात घेण्याबरोबरच ज्याप्रमाणे जिल्हा सरकारी वकिलांचे कार्यालय आहे, त्याच पद्धतीने चीफ डिफेन्स काउन्सील कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. नाशिकच्या जिल्हा न्यायालयात चीफ डिफेन्स काउन्सीलचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयामार्फत आर्थिक दुर्बल घटकातील आरोपींना शासन खर्चाने बचावासाठी वकील देण्याचे काम केले जाणार आहे. यासाठी अलीकडेच विधी व सेवा प्राधिकरणाने वकिलांकडून काउन्सीलसाठी अर्ज मागविण्यात आले व त्यात पात्र ठरू पाहणाºया वकिलांच्या मुलाखती घेऊन त्यांना गुणवत्तेच्या आधारे नेमणुका देण्यात आल्या आहेत. दोन वर्षांसाठी त्यांची नेमणूक असेल. चीफ डिफेन्स काउन्सीलपदी अ‍ॅड. फारूख शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अ‍ॅड. रवी सांगळे, नीलेश राठी या दोघांची डेप्युटी चीफ डिफेन्स काउन्सील म्हणून तर असिस्टंट डिफेन्स काउन्सील म्हणून अ‍ॅड. विजय गुळवे यांची यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अ‍ॅड. फारूख शेख यांनी यापूर्वी नाशिक, मुंबई, ठाणे, कल्याण, अमरावती, धुळे येथे सरकारी वकील म्हणून काम केले आहे. तसेच सरकारी वकिलांचे प्रशिक्षक म्हणूनही काम केले असून, नाशिक पोलीस अकादमीत सहायक संचालक असताना प्रशिक्षणार्थींना कायद्याचे ज्ञान दिले आहे.

टॅग्स :Courtन्यायालयNashikनाशिक