जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनतर्फे एकात्मता दिन साजरा

By Admin | Updated: December 20, 2015 22:37 IST2015-12-20T22:31:38+5:302015-12-20T22:37:11+5:30

जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनतर्फे एकात्मता दिन साजरा

Celebration Day by District Pensions Association | जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनतर्फे एकात्मता दिन साजरा

जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनतर्फे एकात्मता दिन साजरा

नाशिक : जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनतर्फे एकात्मता दिन साजरा करण्यात आला. लेखा व कोषागार सहसंचालक बाळासाहेब घोरपडे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
रोटरी क्लब हॉलमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमात मुख्य लेखावित्त अधिकारी बी. जे. सोनकांबळे, जिल्हा परिषदेचे सहायक लेखाधिकारी संजय जोशी, म्हस्के, संतोष जाधव, अण्णासाहेब भडांगे आदि उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्तांना वैद्यकीय भत्ता मिळावा, महागाई भत्त्याच्या नऊ महिनांचा भत्ता मिळावा, निवड श्रेणी संदर्भातील प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढावीत आदि मागण्या करण्यात आल्या. महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल माधवराव भणगे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रकाश तांबट यांनी, तर आभार यशवंत गायकवाड यांनी केले.

Web Title: Celebration Day by District Pensions Association