शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
4
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
5
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
6
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
7
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
8
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
9
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
10
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
11
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
12
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
13
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
14
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
15
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
16
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
17
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
18
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
19
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर

सण म्हणून शिवजयंती साजरी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:03 PM

शिवजयंती सण म्हणून साजरी करण्याचे आवाहन करीत आईवडिलांची सेवा केली तर प्रत्येक घरात शिवाजी महाराज जन्माला आल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील नामवंत शिवव्याख्याते तथा शिवनिश्चल सेवाभावी संस्थेचे व्याख्याते यशवंत गोसावी यांनी केले.

ठळक मुद्देयशवंत गोसावी : नांदूरवैद्य येथे संगीतमय शिवचरित्र कथा सोहळा

नांदूरवैद्य : शिवजयंती सण म्हणून साजरी करण्याचे आवाहन करीत आईवडिलांची सेवा केली तर प्रत्येक घरात शिवाजी महाराज जन्माला आल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील नामवंत शिवव्याख्याते तथा शिवनिश्चल सेवाभावी संस्थेचे व्याख्याते यशवंत गोसावी यांनी केले.इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे शिवजन्मोत्सवानिमित्त संगीतमय शिवचरित्र कथेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासकालीन कार्याला उजाळा देत असताना गोसावी यांनी शिवाजी महाराजांच्या मोहिमा, तसेच त्यांच्या कार्याविषयीची माहिती मांडली. आजची तरुण पिढी वेगळ्याच मार्गाने जात असून, व्यसनाधीन झाली आहे. आपला मुलगा कोणाच्या संगतीत आहे यारून त्याचे पुढील भविष्य ठरत असते. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे देशहितासाठी लढले. महापुरुषांचे आचार-विचार आचरणात आणून जीवन जगणे काळाची गरज बनल्याचे सांगत तरुणांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. यानंतर नाशिकजवळील साल्हेर किल्ल्याच्या इतिहासाविषयी माहिती दिली. अफजल खान वध, शाइस्तेखानावर हल्ला, नरवीर तानाजीच्या कार्याची माहिती सांगितली. त्याचप्रमाणे इतिहासात अजरामर झालेल्या रायगडावरील हिरकणीचा इतिहास पटवून सांगताना आजच्या मुलींनी मॉँसाहेब जिजाऊंचा आदर्श घ्यावा, असेही सांगितले. यानंतर कार्यक्रम समारोपप्रसंगी गावातील तरुण युवकांच्या हस्ते शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांना शिवप्रतिमा भेट देऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व शिवाजी महाराज यांच्या आरतीने कार्यक्र माची सांगता करण्यात आली.

टॅग्स :cultureसांस्कृतिकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज