अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लब ऑफ कळवणच्या अध्यक्षा स्नेहा मालपुरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका सौ. भाग्यश्री पगार, कमको बँकेचे माजी चेअरमन संजय मालपुरे हे होते. यावेळी स्नेहा मालपुरे यांनी इनरव्हील क्लब व ग्रुपच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती देऊन आगामी काळात कोणते उपक्रम राबविण्यात येणार याची माहिती दिली. इनरव्हील क्लबच्या माध्यमातून देवी मंदिर गणेश नगर, दत्त मंदिर बसस्थानक , विठ्ठल मंदिर आवारात सिमेंटचे बाक मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी सेक्रेटरी नयना पगार, मीनाक्षी मालपुरे, निर्मला संचेती, महानंदा अमृतकार, लता वेढणे, रेखा सावकार, निशा कोठावदे, आदी उपस्थित होते. नयना पगार यांनी प्रास्ताविक केले, तर मीनाक्षी मालपुरे यांनी सूत्रसंचालन केले. निर्मला संचेती यांनी आभार मानले.
कळवणला तालुक्यात ‘इनरव्हील डे’ साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 00:51 IST