शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरसह ग्रामीण भागात होळी सण उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 00:33 IST

सिन्नर : शहरासह ग्रामीण भागात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिरांसमोर व घरांसमोर होळी पेटवून तिचे मनोभावे पूजन करण्यात आले. पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला.

सिन्नर : शहरासह ग्रामीण भागात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिरांसमोर व घरांसमोर होळी पेटवून तिचे मनोभावे पूजन करण्यात आले. पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला.काळाच्या ओघात बऱ्याच पारंपरिक प्रथांचा विसर पडत चालला असला तरी सिन्नर शहर व ग्रामीण भागात होळीच्या सणाचे महत्त्व टिकून आहे. तालुक्यातील निमगाव-सिन्नर येथे पारंपरिक पद्धतीने होळी सण साजरा करून गावची परंपरा जोपासण्याचे कार्य यावर्षी ही सुरू ठेवले. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. या सणाविषयी अनेक कथा जोडलेल्या आहेत. होळीच्या दिवशी रात्री होळी जाळली जाते यामागे एक आख्यायिकाही सांगितली जाते. राजा हिरण्यकश्यपु हा स्वत:ला देव समजत असे; पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णुभक्त होता. राजाने भक्त प्रल्हादला विष्णुभक्ती करण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न केला; पण प्रल्हादाने नकार दिल्यानंतर राजाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. शेवटी राजाने प्रल्हादला मारण्यासाठी बहीण होलिकाची मदत घेतली. होलिकाला अग्नीत न जळण्याचे वरदान प्राप्त होते. राजाच्या सांगण्यावरून प्रल्हादला आपल्या मांडीवर बसवून अग्नीत प्रवेश केला; परंतु विष्णूच्या कृपेने भक्त प्रल्हाद वाचले आणि होलिका भस्म झाल्याचीही आख्यायिका सांगितली जाते. या कथेमधून हा संकेत मिळतो की वाईटावर चांगल्याच विजय होतोच. आजतागायत फाल्गुन पौर्णिमेला होळी जाळली जाते आणि दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते.फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळीचं दुसरं नाव म्हणजे हुताशनी पौर्णिमा. होळी हा सण शहरात तसेच खेड्यापाड्यातून मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला गेला. हीच परंपरा जोपासत निमगाव-सिन्नर येथील ग्रामस्थांनी दरवर्षीप्रमाणे रोकडेश्वराच्या मंदिरासमोर विधिवत पूजा करून होळी सण साजरा केला आणि परंपरेचे जतन केले.खामखेड्यात होळीचा निरुत्साहखामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथे होळीचा सण दुष्काळामुळे निरु त्साहात साजरा करण्यात आला. होळीचा सण शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. या सणासाठी शेतमाल विकून हाती पैसा आलेला असतो. चालू वर्षी शेतकºयांच्या कोणत्याही मालाला भाव नाही. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. त्यामुळे साध्या पद्धतीने होळी सण साजरा करण्यात आला.

टॅग्स :NashikनाशिकHoliहोळी