शहरं
Join us  
Trending Stories
1
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
2
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
3
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
4
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
5
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
6
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
7
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
8
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
9
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
10
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
11
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
12
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
13
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
14
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
15
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
16
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
17
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
18
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
19
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
20
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून जुन्या नाशकात सीसीटीव्ही

By admin | Updated: January 11, 2017 00:40 IST

लोकसहभागातून जुन्या नाशकात सीसीटीव्ही

जुने नाशिक : काझीगढी, कुंभारवाडा येथील नागरिकांनी लोकवर्गणी काढून स्वखर्चाने परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते करण्यात आले. श्री गुरुइच्छा मित्रमंडळ आणि परिसरातील नागरिकांनी हा उपक्रम राबविला.  समाजातील काही समाजकंटक गाड्यांची तोडफोड करणे, जाळपोळ करणे, चोरी, महिलांची छेडछाड, भांडणे, हाणामाऱ्या या कोणाचीही पर्वा न करता करीत असतात. परंतु सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तिसऱ्या डोळ्यात याचे सर्व चित्रण रेकॉर्ड होत असल्याने शहरातील अनेक गुन्हे उघडकीस आल्याने पोलिसांना तपासकार्यात मोठी मदत होत आहे. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे परिसरातील नागरिक शांततेने आणि भीती न बाळगता आता निर्भयपणे राहू शकतात. यामुळे सामाजिक सुरक्षितता निर्माण होऊन गुन्हेगारीला आळा बसेल. त्याकरिता परिसरातील नागरिकांनी श्री गुरुइच्छा मित्रमंडळाचा आदर्श घेऊन त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन आमदार फरांदे यांनी केले.  अध्यक्षस्थानी शहर काँग्रेसचे शरद अहेर होते. त्यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार संघाचे अध्यक्ष अरुण नेवासकर, नगरसेवक विनायक पांडे, नगरसेवक वत्सला खैरे, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख, रमाकांत क्षीरसागर, बबलू खैरे, किरण क्षीरसागर, राधेश्याम गायकवाड, ऋषीकेश चौधरी आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक गुरुइच्छा मित्रमंडळाचे संस्थापक अरविंद क्षीरसागर यांनी केले, तर आभार मोहन गायकवाड यांनी मानले.