नाशिक : व्हि.एन.नाईक शिक्षण संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सीसीटीव्ही कँमेरे कार्यान्वीत करण्यात आले. विद्यालयाच्या परिसरात एकलहरे परिसरातील टवाळखोर मुलांचा संचार होत असतो. तसेच शिक्षकांना अरेरावी करणे, हाणामारी करणे, मोटारसायकलचा स्टंट करणे, शिवीगाळ करणे असे प्रकार करतांना अनेकदा आढळुन आले आहेत. एकलहरे पालक शिक्षक संघाकडे याबात पालकांनी तक्र ारीही केल्या होत्या. त्यामुळे अनेकदा पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते. यासाठी संचालक सुरेश घुगे यांनी पुढाकार घेऊन शालेय व्यवस्थापन समिती व शिक्षक पालक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून शाळेत सीसीटीव्ही कँमेरे बसविण्याबाबत विचार विमर्ष करण्यात आला. यासाठी प्रत्येक पदाधिकाºयाने वर्गणी जमा करु न निधि उभा केला. यामधुन शाळेच्या आवारात ११ ठिकाणी कँमेरे बसवुन कार्यान्वित करण्यात आले. याचे उद्घाटन वीज केंद्राचे उपमुख्य अभियंता राकेश कमटमकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजाराम धनवटे, आसाराम शिंदे, शानु निकम, सागर जाधव, प्राचार्य पी. एस. सागळे, उपप्राचार्या रजनी गिते, विश्वनाथ होलीन, लकी ढोकणे आदी उपस्थित होते.
एकलहरे विद्यालयात सीसीटीव्ही कार्यान्वीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 13:13 IST
नाशिक : व्हि.एन.नाईक शिक्षण संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सीसीटीव्ही कँमेरे कार्यान्वीत करण्यात आले. विद्यालयाच्या परिसरात एकलहरे परिसरातील ...
एकलहरे विद्यालयात सीसीटीव्ही कार्यान्वीत
ठळक मुद्देपालक शिक्षक संघाकडे याबात पालकांनी तक्र ारीअनेकदा पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते प्रत्येक पदाधिकाºयाने वर्गणी जमा करु न निधि उभा केला