शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्हीमुळे चोरटा गजाआड :  चार हजाराची रोकड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:11 IST

डीजीपीनगर, बोधलेनगर येथील श्री साई मंदिरातील दानपेटीसह १२ हजार रुपयांची रोकड चोरून नेणाऱ्या चोरट्यास चार दिवसांत उपनगर पोलिसांनी रोटरी क्लबच्या वतीने लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने गजाआड केले.

नाशिकरोड : डीजीपीनगर, बोधलेनगर येथील श्री साई मंदिरातील दानपेटीसह १२ हजार रुपयांची रोकड चोरून नेणाऱ्या चोरट्यास चार दिवसांत उपनगर पोलिसांनी रोटरी क्लबच्या वतीने लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने गजाआड केले. चोरट्याकडून चार हजाराची रोकड जप्त करण्यात आली असून, त्याचा एक साथीदार मात्र अद्याप फरार आहे.  साई मंदिरात गेल्या मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्याने चोरी करून दोन्ही मंदिरांतील दानपेटी, पितळी थाळी चोरून नेली होती. बुधवारी सकाळी मंदिरात चोरी झाल्याचे निदर्शनास येताच या घटनेची माहिती उपनगर पोलिसांना देण्यात आली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते व त्यांच्या सहकाºयांनी दोन्ही मंदिरांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी रोटरी क्लबच्या वतीने मंदिर व आजूबाजूच्या सोसायटी परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमºयाच्या फुटेजवरून पोलिसांना चोरट्याची ओळख पटविणे सोपे झाले. त्या सीसीटीव्ही कॅमेºयाच्या फुटेजवरून पोलिसांनी संशयित सूरज दिलीप बागुल (२४, रा. ब्रिजनगर, जेलरोड) यास अटक केली असून, त्याच्याकडून दोन्ही मंदिरांतून चोरलेल्या चिल्लर व रोकडपैकी चार हजार रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. संशयित सूरज याला न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवस पोलीस कोठडी देण्यात आली.  रोटरी क्लबच्या वतीने नाशिकरोड परिसरात ५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने गैरप्रकाराला आळा बसला आहे. सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेज डीव्हीआरमध्ये संग्रहित होते. रोटरीने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाचे काही ठिकाणचे डीव्हीआर हे बंद करून ठेवले जात असल्याने त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे डीव्हीआर बंद करू नये, असे आवाहन कौसर आझाद यांनी केले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtheftचोरी