शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

घोटी खुर्दच्या सरपंचांचे जातप्रमाणपत्र अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 12:52 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील अत्यंत संवेदनशील असणाऱ्या घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच मंदाकिनी गोडसे यांचे कुणबी जातप्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. त्यांचा इतर मागास प्रवर्गातील कुणबी जातीचा दावाही अवैध ठरविण्यात आल्याचा आदेश नाशिकच्या जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील अत्यंत संवेदनशील असणाऱ्या घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच मंदाकिनी गोडसे यांचे कुणबी जातप्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. त्यांचा इतर मागास प्रवर्गातील कुणबी जातीचा दावाही अवैध ठरविण्यात आल्याचा आदेश नाशिकच्या जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य आत्माराम फोकणे यांनी गोडसे यांच्या विरोधात जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्र ार केली होती.वर्षभरापासून अनेकदा झालेल्या सुनावण्यांद्वारे दोन्ही पक्षकारांना आपली बाजु मांडण्याची संधी देण्यात आली होती. नाशिकच्या जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटोळे, सदस्य माधव वाघ, सदस्य सचिव संगीता डावखर यांच्या त्रिसदस्यीय समितीने गोडसे यांचे जातप्रमाणपत्र रद्द करून त्यांच्या जातीचा दावा अवैध ठरविला. दरम्यान ह्या आदेशामुळे घोटी खुर्दच्या थेट सरपंच मंदाकिनी गोडसे यांना पदच्युत व्हावे लागणार आहे. थेट सरपंचपदावरच गंडांतर आल्याने पुन्हा निवडणुक होईल की सदस्यांमधून सरपंच निवडला जाईल याबाबत इगतपुरी तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.----------------------------घोटी खुर्द येथील मंदाकिनी गोडसे यांनी इतर मागास प्रवर्गातील हिंदू कुणबी जातीच्या दाखल्यावर थेट सरपंचपदाची निवडणूक लढवली होती. गोडसे यांनी नामनिर्देशन पत्र भरताना कुणबी जातीचे नसतांना खोटे पुरावे, खोटे प्रतिज्ञापत्र व घोषणापत्र सादर केले होते. याबाबत सूनावण्या होऊन नाशिकच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने गोडसे यांना इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले कुणबी जातीचे प्रमाणपत्र रद्द केले आहे. गोडसे यांनी जात प्रमाणपत्र काढतांना खोटी वंशावळ जोडून कुणबी जातीचा खोटा दाखला मिळवण्यासाठी त्रयस्थ व्यक्तींच्या जातीच्या पुराव्यांचा गैरवापर केला होता. याबाबत तक्र ारदार माजी ग्रामपंचायत सदस्य आत्माराम फोकणे यांनी पुरावे सादर केले होते.-----------------------------प्रांताधिकाºयांची दिशाभूल करून गोडसे यांनी कुणबी जातीचा दाखला घेतला होता. यासह अर्थबळाच्या जोरावर जातीचे प्रमाणपत्र वैध करण्यासाठी त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह जिल्ह्यातील अनेक नेत्यांना वेठीस धरले होते. मात्र त्यांचा खटाटोप समितीने व्यर्थ ठरवला. माझ्याकडील भक्कम पुराव्यांच्या बळावर न्यायदेवतेने गोडसे यांचे पितळ उघडे पाडले. हा विजय सर्व ग्रामस्थांचा आहे असे मी समजतो.- आत्माराम फोकणे, तक्र ारदार

टॅग्स :Nashikनाशिक