लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : ट्रकमध्ये झोपलेल्या चालक व क्लिनरच्या खिशातुन दहा हजार रुपयांचा भ्रमणध्वनी संच व साडेपाच हजारांची रोकड चोरुन नेणाऱ्या अज्ञात चोरट्याविरुद्ध किल्ला पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास मनमाड चौफुली येथील शिवशक्ती ट्रान्सपोर्ट समोर ही घटना घडली. बाळु चिलकला नागाप्पा (३३) रा. पसुमर आंध्राप्रदेश या चालकाने फिर्याद दिली. फिर्याद व क्लिनर नरेंद्रबल भद्राणी हे ट्रक (क्र. ए.पी. २८ पी. ए.५८०८) मध्ये झोपले असताना अज्ञात इसमाने ही चोरी केली. अधिक तपास पोलीस नाईक भामरे करीत आहेत.
ट्रकचालकाच्या खिशातुन रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 19:15 IST