शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ई-चलानमध्ये रोख दंड भरण्याची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:22 IST

बेशिस्त वाहनचालकांकडून दंडवसुलीसाठी शहर वाहतूक विभागाने सुरू केलेल्या ई-चलान पद्धतीत सुधारणा करण्यात आली असून, नागरिकांना आता डेबिट, क्रेडिट कार्ड तसेच रोख रक्कम देऊनही दंड भरता येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे़

नाशिक : बेशिस्त वाहनचालकांकडून दंडवसुलीसाठी शहर वाहतूक विभागाने सुरू केलेल्या ई-चलान पद्धतीत सुधारणा करण्यात आली असून, नागरिकांना आता डेबिट, क्रेडिट कार्ड तसेच रोख रक्कम देऊनही दंड भरता येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे़  नोटाबंदीच्या निर्णयानंतर दंडवसुली करताना नागरिक व पोलिसांमध्ये वाद होत असल्याने जून २०१७ मध्ये ई-चलान प्रणाली सुरू केली़ यामध्ये डेबिट व क्रेडिट कार्ड स्वॅप करून दंड भरण्याची सुविधा उपलब्ध होती. परंतु पैसे भरण्यास वाहनधारक उत्सुक नसल्याने या प्रणालीत सुधारणा करून कार्डबरोबरच आता रोख स्वरूपातही दंड भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे़  बेशिस्त वाहनचालकाने ई-चलान प्रणाली कार्डद्वारे अथवा रोख स्वरूपात दंडाचा भरणा करताच त्याने दिलेल्या मोबाइल नंबरवर त्यास रक्कम भरणा झाल्याचा संदेश मिळणार आहे. तसेच दिलेल्या लिंकवर गेल्यास ई-चलानची पावती संबंधित वाहनधारकास डाउनलोड करून त्यांची प्रिंट काढता येणार आहे़ या प्रणालीमुळे वाहनचालकाचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे, या प्रणालीची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल झाल्यामुळे वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन-चालकांची माहिती डिजिटल स्वरूपात पोलीस प्रशासनास उपलब्ध होणार आहे. या माहितीमुळे वारंवार नियम मोडणाºया चालकांवर परवाने निलंबनाची कारवाई करणे शक्य होणार असून, हा डाटा प्रादेशिक परिवहन विभागाशी जोडून वाहनधारकाचे नाव व पत्ता आपोआप मिळणे शक्य होणार आहे.ई-चलान पध्दतीत सुधारणाबेशिस्त वाहनचालकांकडून दंडवसुलीसाठी शहर वाहतूक विभागाने सुरू केलेल्या ई-चलान पद्धतीत सुधारणा.डेबिट, क्रेडिट कार्ड तसेच रोख रक्कम देऊनची दंड भरता येणार.  प्रणालीत सुधारणा करून कार्डबरोबरच आता रोख स्वरूपातही दंड भरण्याची सुविधा उपलब्ध.  दंडाचा भरणा करताच त्याने दिलेल्या मोबाइल नंबरवर त्यास रक्कम भरणा झाल्याचा संदेश मिळणार.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस