शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
6
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
8
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
9
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
10
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
11
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
12
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
13
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
14
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
15
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
16
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
17
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
18
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
19
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
20
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा

तर आयुक्तांबरोबरच महासभाही येणार अडचणीत

By sanjay.pathak | Published: April 25, 2018 1:06 AM

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका प्रभागाच्या पोटनिवडणुकीच्या दरम्यान घेतलेला निर्णय म्हणजे आचारसंहिता भंग करणारा असल्याचा ठपका महासभेने ठेवला असला तरी यानिमित्ताने महासभेनेही विधान परिषदेची निवडणूक सुरू असताना घेतलेला निर्णयदेखील तितकाच अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देआदर्श आचारसंहितेच्या नियमावलीवरून खल खुल्या भूखंडासाठी नवीन करयोग्य मूल्य ठरविल्याने शहरात मोठ्या प्रमाणात करवाढ जिल्हाधिकारी किंवा तत्सम यंत्रणेची परवानगी घेतली होती काय?

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका प्रभागाच्या पोटनिवडणुकीच्या दरम्यान घेतलेला निर्णय म्हणजे आचारसंहिता भंग करणारा असल्याचा ठपका महासभेने ठेवला असला तरी यानिमित्ताने महासभेनेही विधान परिषदेची निवडणूक सुरू असताना घेतलेला निर्णयदेखील तितकाच अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेच्या नियमावलीवरून खल सुरू झाला असतानाच यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाच्या निवृत्त उच्चपदस्थ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी आयुक्तांनी निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी घेतली असल्यास ते अडचणीत येऊ शकणार नाही. अन्यथा अडचण निर्माण होऊ शकते.  महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मिळकत कर आणि खुल्या भूखंडासाठी नवीन करयोग्य मूल्य ठरविल्याने शहरात मोठ्या प्रमाणात करवाढ लादली गेल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे राजकीय नेते विशेषत: सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी राजकीयदृष्ट्या अडचणीत आल्यानंतर तातडीने मंगळवारी (दि.२३) महासभा बोलविण्यात आली. त्यात बहुमताने नगरसेवकांनी विरोध केला आणि एकमताने करवाढ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ३१ मार्च रोजी करयोग्य मूल्याची अधिसूचना जारी केली. त्यावेळी प्रभाग क्रमांक १३च्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू होती आणि त्यावेळी कोणत्याही प्रकारचा धोरणात्मक निर्णय घेणे म्हणजे आचारसंहितेचा भंग असतानादेखील तुकाराम मुंढे यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे आयुक्तांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका महासभेत ठेवत त्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सध्या विधान परिषदेच्या नाशिक जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने कोणत्याही प्रकारचा निर्णय न घेता करवाढ स्थगित करण्याचा ठराव महासभेत करण्यात आला.  विशेष म्हणजे याच महासभेत प्रशासनाला आयुक्तांनी आचारसंहिता कालावधीत निर्णय घेताना जिल्हाधिकारी किंवा तत्सम यंत्रणेची परवानगी घेतली होती काय? असे प्रश्न केल्यानंतर अधिकाºयांना उत्तर देता आले नव्हते. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाच्या सेवानिवृत्त उच्चपदस्थ अधिकाºयाशी संपर्क साधला असता त्यांनी कोणत्याही प्रकारची निवडणूक आचारसंहिता त्या क्षेत्रासाठी लागू असेल तर अशावेळी धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. मात्र, महापालिकेसारख्या संस्थांमध्ये जर तातडीची अत्यावश्यक कामे असतील तर मात्र राज्य निवडणूक आयोगाकडे तसा प्रस्ताव पाठविल्यास त्यास तातडीची निकड म्हणून त्यांना परवानगी देता येते.  यापूर्वी अशाप्रकारे नाशिकसह अनेक महापालिकांना राज्य निवडणूक आयोगाने पूर्वी मान्यता दिली आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या आयुक्तांनी राज्य निवडणूक आयोगाकडून अशाप्रकारची विशेष परवानगी घेऊन अधिसूचना काढली असेल अडचणीचा मुद्दा नाही. मात्र नसेल तर तो अडचणीचा निर्णय ठरू शकतो. दुसरीकडेच या निर्णयाच्या अनुषंघाने महापालिकेने घाईघाईने महासभा घेऊन ऐन आचारसंहितेत निर्णय घेतला असेल तर तोदेखील तितकाच अडचणीचे ठरू शकते, असे या निवृत्त अधिकाºयाने सांगितले. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीसाठी महापालिका,जिल्हा परिषद आणि नगरपालिकेतील निर्वाचीत सदस्य मतदार असतात त्यामुळे महासभेचा धोरणात्मक निर्णय थेट या मतदारावर प्रभाव टाकणारा ठरू शकतो असे ही या अधिकाºयांनी सांगीतले.करवाढीने प्रभाव पडू शकेल काय?महापालिका आयुक्तांनी करवाढीबाबत शहरात नाराजीची भावना आहेच, परंतु आचारसंहिता भंगाचे त्यासाठी महासभेने पुढे केलेले कारण मात्र गोंधळात टाकणारे आहे असे निवडणूक आयोगाच्या दुसºया एका निवृत्त अधिकाºयाचे म्हणणे आहे. आयुक्तांनी करवाढ केल्याने त्याचा प्रलोभन दाखवण्यासाठी उपयोग होऊ शकत नाही, त्यामुळे प्रभाव पाडणारा निर्णय असे कसे काय म्हणता येईल, असा प्रश्न संबंधितांनी केला.अर्थात, ज्या निवडणूक अधिकाºयांपुढे ही तक्रार जाईल त्यांची याबाबतची भूमिका वेगळी असू शकते, असेही या अधिकाºयाने सांगितले. शहरातील एका ज्येष्ठ विधीज्ञाच्या मतानुसार महापालिकेच्या निवडणूक किंवा पोटनिवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोग महापालिका आयुक्तांना निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त करते.  अशावेळी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याची किंबहूना करून घेण्याची जबाबदारी आयुक्तांची असते. अशा आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकाºयाने आचारसंहिता भंग केल्याची तक्रार केली तर ती अधिक गंभीर ठरू शकते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका