सिन्नर : विनयभंग केल्याप्रकरणी तालुक्यातील पास्ते येथील दोघांना सिन्नर न्यायालयाने तीन महिने सक्तमजुरीसह प्रत्येकी साडेसात हजार रुपयांचा दंड ठोठावलाआहे. २४ आॅक्टोबर २०१२ रोजी पास्ते शिवारात आरोपींनी दगडाला शेंदूर फासून तो शेत गट नंबर ५६६ मध्ये ठेवला होता. त्यास महिलेने विरोध करून तो फेकून दिला होता. त्याचा राग आल्याने राजेश छोटूराम घुगे व भगवान जगन्नाथ आव्हाड या दोघांनी महिलेला मारहाण करीत तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी महिलेने सिन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणी घुगे व आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास हवालदार कैलास इंद्रेकर यांनी केला. पोलिसांनी सिन्नर न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यात सरकार पक्षातर्फे अॅड. स्वाती दांडेकर यांनी काम पाहिले. न्यायाधीश मिलिंद जाधव यांनी आरोपी राजेश घुगे व भगवान आव्हाड यांना तीन महिने सक्तमजुरी व प्रत्येकी सात हजार पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. (वार्ताहर)
विनयभंग प्रकरणी पास्तेच्या दोघांना सक्तमजुरी
By admin | Updated: January 20, 2016 22:52 IST