शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यात गर्दी जमविल्याने हेमंत शेट्टीवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 16:28 IST

डॉक्टर मारहाण प्रकरणाशी शेट्टी किंवा त्यांच्या कोणी कार्यकर्त्यांचा संबंध आहे का्य याबाबतही अंबड पोलीस पुढे तपास करत आहेत.

ठळक मुद्देआपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग कायद्याचे उल्लंघन

नाशिक : येथील पंचवटी विभागातील नगरसेवक हेमंत शेट्टी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांविरूध्द अंबड पोलीस ठाण्यात गैरकायद्याची मंडळी जमवून जमावबंदी कायद्यासह साथरोग कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंबड पोलीस ठाण्यासमोर असलेल्या एका हॉटेलजवळ शेट्टी हे त्यांच्या पंधरापेक्षा अधिक कार्यकर्त्यांसह उभे होते. वैद्यकिय सेवा संस्था कायद्यानुसार अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील संशयित आरोपी पियुष उल्हास राजुरकर व आकाश अशोक पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेत कार्यवाहीसाठी पोलीस ठाण्यात आणले. यावेळी शेट्टी यांनी पंधरा ते वीस कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात विनाकारण गर्दी केल्याचे पोलीस नाईक सुकदेव गिºहे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीनुसार शेट्टी यांच्यासह त्यांच्या पंधरा ते वीस कार्यकर्त्यांविरूध्द पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. शेट्टी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलपुढे उभे असतानासुध्दा साथरोगाच्या अनुषंगाने कुठलीही खबरदारी म्हणून उपाययोजना न केल्याचे दिसून आले. तसेच विनाकारण पोलीस ठाण्यात मंगळवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास येत गर्दी करत संसर्गाचा धोका असतानासुध्दा त्याकडे दुर्लक्ष केले. आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शेट्टी व त्याच्या कार्यकर्त्यांविरूद्ध नाईक यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, डॉक्टर मारहाण प्रकरणाशी शेट्टी किंवा त्यांच्या कोणी कार्यकर्त्यांचा संबंध आहे का्य याबाबतही अंबड पोलीस पुढे तपास करत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी