शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

देवळाली येथे मारहाण प्रकरणी गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 01:19 IST

देवळालीगाव सुंदरनगर येथे बेदम मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नाशिकरोड : देवळालीगाव सुंदरनगर येथे बेदम मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.जयभवानीरोड फर्नांडिसवाडी येथील शुभम हरबीर बहेनवाल (१९) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास देवळालीगाव सुंदरनगर येथे कामानिमित्त गेलो होतो. यावेळी लक्ष्मण बापू कुमावत (२३) रा. गोरेवाडी व त्याचे दोन अनोळखी साथीदार यांनी काहीएक कारण नसताना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व धारदार हत्याराने दोन्ही हातांवर, मानेवर वार करून जखमी केले.गोरेवाडी शास्त्रीनगर येथील लक्ष्मण बापू कुमावत याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास भावाला शोधण्यासाठी देवळालीगाव सुंदरनगर येथे गेलो होतो. यावेळी शुभम ऊर्फ बाशी हरबीर बहेनवाल, जय ऊर्फ मारुती वाल्मीक घोरपडे (रा. सुंदरनगर देवळालीगाव) यांनी लक्ष्मण याला किरकोळ कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली व कोयत्याने लक्ष्मणच्या डोक्यात व हातावर वार करून जखमी केले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल केलेआहेत.युवकास मारहाणआगरटाकळी वैदूवाडी येथील अंबरिश अशोक लोखंडे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुगंध निर्मळ रा. समतानगर आगरटाकळी व त्याच्या एका मित्राने अंबरिश यास वडिलांना शिवीगाळ का केली या कारणावरून कुरापत काढून शिवीगाळ करून मारहाण केली. सुगंध निर्मळ याने लोखंडी रॉडने अंबरिशच्या डोक्यात, डाव्या खांद्यावर गंभीर दुखापत करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी